RCB vs DC:  आयपीएल 2022 च्या 27 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्ली कॅपिटल्सवर (RCB vs DC) 16 धावांनी मात केली.  बंगळूरुचा हा सहा सामन्यांत चौथा विजय ठरला. यासामन्यात बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीनं ऋषभ पंतचा अफलातून झेल घेतला. ज्यानंतर पव्हेलियनमध्ये बसलेल्या विराटची पत्नी अनुष्का शर्मानं भन्नाट प्रतिक्रिया दिली. अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. 


दिल्लीविरुद्ध सामन्यातील सतराव्या षटकात कर्णधार फाफ डू प्लेसिसनं मोहम्मद सिराजला गोलंदाजीसाठी बोलवलं. त्यावेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत धमाकेदार फलंदाजी करत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्यानं षटकारही मारला. त्यानंतर मोहम्मद सिराजनं ऑफ स्टंपबाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर ऋषभ पंतनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, विराट कोहलीनं हवेत उडी मारून एका हातानं झेल पकडत ऋषभ पंतला माघारी धाडलं. त्यानंतर पव्हेलियनमध्ये बसलेल्या अनुष्का शर्मा अनोख्या अंदाजात सिलेब्रेशन केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 



बंगळुरूचा 16 धावांनी विजय, दिनेश कार्तिक ठरला विजयाचा शिल्पकार
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळूरुनं दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकांत 7 बाद 173 धावाच करता आल्या. या सामन्यात बंगळुरूचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं 34 चेंडूत 66 धावा केल्या. ज्यामुळं बंगळुरूच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सवर 16 धावांनी विजय मिळवला आहे. बंगळूरुचा चौथा विजय आहे.


हे देखील वाचा-