ENG vs IND: भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौरा करणार आहे. जिथे भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय नियामक मंडळानं भारतीय संघाची घोषणा केली आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, केएल राहुलकडं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. या दौऱ्यात चेतेश्वर पुजाराचं पुनरागमन झालं आहे. तर, वृद्धिमान साहाला संघात स्थान मिळालं नाही.
भारतीय नियामक मंडळानं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी खेळण्यात आलेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील एक सामना खेळायचा शिल्लक होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं हा सामना पुढे ढकलण्यात आला होता. हा सामना 1 जुलै- 5 जुलैदरम्यान खेळवला जाणार आहे.
चेतेश्वर पुजारांचं कसोटी संघात पुनरागमन
खराब फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराला कॉऊन्टी क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची निवड करण्यात आली नव्हती. त्यानंतर दोघांचीही कारकीर्द संपली असं वाटू लागलं होतं. मात्र, कॉऊन्टी क्रिकेटमध्ये पुजारानं शतकांचा पाऊस पाडला. ज्यामुळं इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली.
भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
बीसीसीआयचं ट्वीट-
हे देखील वाचा-