Royal Challengers Bangalore IPL 2022 Playoffs: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यावर आला असून या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचलेल्या चारही संघाची नावं निश्चित झाली आहेत. गुजरात टायटन्सनं सर्वात आधी प्लेऑफमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सनं प्लेऑफमध्ये धडक दिली.  काल दिल्लीविरुद्ध सामन्यात मुंबईनं विजय मिळवला. ज्यामुळं रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळाली. प्लेऑफमध्ये स्थान मिळवून बंगळुरूच्या संघानं त्यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद केली आहे. आठव्यांदा बंगळुरूच्या संघानं प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. याबाबत बंगळुरूच्या संघानं कोलकात्याला मागं टाकलं आहे. 


आरसीबीची आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश
आयपीएल 2022 मधील 69 व्या सामन्यात मुंबईनं दिल्लीचा पाच विकेट्स राखून पराभव केला. या पराभवामुळं दिल्लीचं आयपीएल 2020 मधून बाहेर पडावं लागलं. इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक वेळा पोहोचण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. चेन्नईने 11 वेळा या स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ नऊ वेळा प्लेऑफमध्ये पोहचला आहे. आरसीबी या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आठव्यांदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला.


आरसीबीच्या नावावर नवा विक्रम
प्लेऑफमध्ये सर्वाधिक स्थान मिळवलेल्या संघाच्या यादीत कोलकात्याच्या संघ चौथ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये सर्वाधिक वेळा पोहोचण्याच्या बाबतीत आरसीबीनं कोलकात्याला मागं टाकलं. कोलकात्यानं सातवेळा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या यादीत चौथ्या स्थानावर आहे.


हे देखील वाचा-