MI vc DC : आयपीएल (IPL 2022) स्पर्धेच्या 15 व्या हंगामातील लीग सामने आता संपत आले आहेत. प्लेऑफचे संघ समोर आले आहेत. दरम्यान प्लेऑफचा चौथा संघ कोणता हे शनिवारी पार पडलेल्या दिल्ली विरुद्ध मुंबई (DC vs MI) सामन्यातून समोर आले. या रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा पराभव झाला आणि बंगळुरुचा पुढील फेरीत जाण्याचा रस्ता स्पष्ट झाला. दरम्यान या रोमहर्षक सामन्यात सर्वांचे लक्ष खेळाडूंच्या खेळाकडे असताना कॅमेरामन मैदानातील सुंदर मुलींना शूट करण्यात व्यस्त होता. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकदा कॅमेरामन सामन्यादरम्यान क्यूट मुलींची झलक दाखवत असल्याचं दिसून आलं आहे. पण यावेळी असं करताना एका प्रेक्षकाने चक्क कॅमेरामनचं शूटिंग केलं आहे.


सोशल मीडियावर VIDEO व्हायरल


सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहिलंतर जवळपास दोन मिनिटं कॅमेरामन मैदानातील मुलींवर फोकस करत असल्याचं दिसून येत आहे. तो मुलींचे सर्व एक्सप्रेशन कॅमेऱ्यात कैद करत असून मुलीही त्यांच्यावर कॅमेरा असल्याचं कळताच लाजून जातात. 32 सेंकदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.



सामन्याचा लेखा-जोखा


अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीचा पाच विकेटने पराभव करत यंदाच्या आयपीएलचा शेवट गोड केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाचे बरेच फलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर घायाळ झाले. पृथ्वी शॉ (24 धावा) तर कर्णधार ऋषभ पंतनं 33 चेंडूत 39 धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 43 धावा केल्या. ज्यामुळे संघाचा स्कोर 159 झाला. ज्यानंतर दिल्लीने दिलेले 160 धावांचे आव्हान मुंबईने पाच गडी राखून पूर्ण केले. मुंबईची यंदीची कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी शेवट गोड केलाय. या पराभवासह दिल्लीचे प्लेऑफचं स्वप्न तुटले आहे. मुंबईच्या विजयामुळे आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचली आहे. 


रोहित शर्मा 13 चेंडूत दोन धावा काढून बाद झाला. त्यानंतर  ईशान किशन आणि डोवॉल्ड ब्रेविस यांनी मुंबईचा डाव सावरला. दोंघानी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागिदारी केली. इशान किशन  48 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेविसही 37 धावा काढून बाद झाला. टीम डेविड (34) आणि तिलक वर्मा (21) यांनी मुंबईचा विजय दृष्टीक्षेपात आणला. मुंबई जिंकणार असे वाटत असतानाच दोघेही बाद झाले. त्यानंतर डॅनिअल सॅम्स आणि रमनदीप सिंह यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. 


हे ही वाचा -