Tim David, MI vs DC IPL 2022 : अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने चेन्नईचा पाच विकेट आणि पाच चेंडू राखून पराभव केला. या विजयासह मुंबईने यंदाच्या आयपीएल हंगामाचा शेवट गोड केलाय. पण मुंबईच्या विजयाचा फायदा आरसीबीला झालाय. त्यामुळेच सामन्याआधीपासूनच आरसीबीचे खेळाडू आणि चाहते मुंबईला सपोर्ट करत होते. अखेर मुंबईमुळे आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळाले. 


दिल्लीविरोधातील मुंबईच्या विजयाचा हिरो टिम डेविड याने सामन्यानंतर मोठा खुलासा केलाय. दिल्लीविरोधातील सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याचा मेसेज आला होता, असा खुलासा टिम डेविडने केलाय. या मेसेजमध्ये विराट कोहली, फाफ आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा फोटो होता. या तिन्ही खेलाडूंनी मुंबईच्या सपोर्टसाठी मुंबई इंडियन्स संघाची जर्सी घातलेली होती.. असे टिम डेविडने सांगितले. 


सामन्यानंतर बोलताना टिम डेविड म्हणाला की, विजायाने हंगामाचा शेवट करणे, हा एक शानदार अनुभव आहे. दुसऱ्या डावात खेळपट्टीवर फलंदाजी करणे थोडं कठीण होतं. बॉल थांबून येत होता. ईशान किशनने खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण असल्याचे सांगितले.. त्यामुळे मी टायमिंगवर लक्ष केंद्रीत केले., असे टिम डेविड म्हणाला.


टिम डेविडच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा पराभव केला. मुंबईच्या विजयानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी सेलिब्रेशनही केले. विराट कोहली आणि आरसीबीच्या खेळाडूंनी मुंबईला धन्यवाद म्हटले तर रोहित शर्माने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 






रोमांचक सामन्यात मुंबईचा विजय -
160 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा संघर्ष करताना पाहायाला मिळला. रोहित शर्मा 13 चेंडूत दोन धावा काढून बाद झाला. त्यानंतर  ईशान किशन आणि डोवॉल्ड ब्रेविस यांनी मुंबईचा डाव सावरला. दोंघानी दुसऱ्या विकेटसाठी  51 धावांची भागिदारी केली. इशान किशन  48 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेविसही 37 धावा काढून बाद झाला. टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा विजय दृष्टीक्षेपात आणला. मुंबई जिंकणार असे वाटत असतानाच दोघेही बाद झाले. त्यानंतर डॅनिअल सॅम्स आणि रमनदीप सिंह यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. इशन किशन ४८, रोहित शर्मा २, डेवॉल्ड ब्रेविस ३७, तिलक वर्मा २१, टीम डेविड ३४ रमनदीप सिंह १३ यांनी महत्वाची खेळी केली. दिल्लीकडून नॉर्त्जे आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवला एक विकेट मिळाली. 


जसप्रीत बुमराहसह रमनदीप सिंह (Ramandeep Singh), डेनियल सॅम्स (Daniel Sams) आणि मयंक मार्कंडे (Mayank Markande) आणि चांगली गोंलदाजी केली. ज्यामुळं दिल्लीच्या संघाला 20 षटकात सात विकेट्स गमावून 159 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं (Rovman Powell) सर्वाधिक 43 धावा केल्या.


प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीच्या डावातील तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहनं डेव्हिड वार्नरच्या (5 धावा) रुपात दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर मिचेश मार्शही (0 धाव) डेनियल सॅम्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ (24 धावा) आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, तोही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात बाद झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं सघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही संघाची धावसंख्या पुढे नेता आली नाही. त्यानं 33 चेंडूत 39 धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. ज्यात चार षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. रोव्हमन पॉवेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रमनदीप सिंहला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, डेनियल्स सॅम्स, मयांक मार्कंडेय यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.