Mumbai Indians Record Rohit Sharma IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं अतिशय निराशाजनक कामगिरी करून दाखवली. आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर राहून मुंबईच्या संघानं आयपीएल 2022 ला अलविदा केलं. मुंबईनं त्यांच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीला पराभूत करून शेवट गोड केला. या सामन्यात मुंबईनं दिल्लीला पाच विकेट्सनं पराभूत केलं. यंदाच्या हंगामात खराब कामगिरी करूनही मुंबईच्या नावावर एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबईच्या संघानं आयपीएलच्या एका हंगामात 100 हून अधिक षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. मुंबईच्या संघानं तब्बल सात वेळा 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत.
मुंबईचा नवा पराक्रम
मुंबईच्या संघानं यंदाच्या हंगामात एकूण 100 षटकार ठोकले आहेत. मुंबईसाठी टीम डेव्हिडनं या हंगामात सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याच्या नावावर 16 षटकारांची नोंद आहे. या यादीत तिळक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 14 सामन्यात 16 षटकार मारले आहेत. आयपीएल 2020 मध्ये मुंबईनं सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. या हंगामात मुंबईनं एकूण एकूण 137 षटकार ठोकले होते. याआधी मुंबईनं 2013 मध्ये 117, 2015 मध्ये 120, 2017 मध्ये 117, 2018 मध्ये 107 आणि 2019 मध्ये 115 षटकार मारण्याचा विक्रम केला होता.
आयपीएल 2022 मध्ये मुंबईची खराब कामगिरी
तब्बल पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाला यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात मुंबईच्या संघानं 14 पैकी 10 सामन्यात पराभव स्वीकाराला आहे. तर, फक्त चार सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबईच्या संघानं आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सलग आठ सामने गमावले आहेत. रोहितच्या कारकिर्दीतील हा सर्वात खराब आयपीएलचा हंगाम ठरला होता.
हे देखील वाचा-