RR vs RCB, Pitch Report :आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या दोन्ही संघात दुसरा क्वॉलीफायर सामना खेळवला जात आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त नक्कीच करतील. पण याच महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू दिनेश कार्तिकला झटका बसला आहे. कार्तिकला आयपीएल आचारसंहितेचं उल्लघंन केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे.


एलिमिनेटरच्या सामन्यात बंगळुरु आणि लखनौ संघ आमने-सामने होते. यावेळी दिनेश कार्तिककडून (Dinesh Karthik) आयपीएल आचार संहितेचं अर्थात कोड ऑफ कंडक्टचं (IPL Code of Conduct) उल्लंघन झालं. आयपीएलकडून नेमकं कारण सांगण्यात आलेलं नाही, पण आचार संहितेच्या कलम 2.3 अंतर्गत स्तर 1 गुन्ह्याची नोंद झाली असून दिनेशने देखील आपली चूक स्विकार केली आहे. 


लखनौविरुद्ध विजयात दिनेशची महत्त्वाची खेळी


बंगळुरु संघाने लखनौला मात देत क्वॉलीफायर 2 मध्ये एन्ट्री मिळवली. 14 धावांनी मिळवलेल्या या विजयात दिनेश कार्तिकचीही मोलाची कामगिरी होतीय. संघाची धावसंख्या 207 पर्यंत नेण्यात दिनेशने महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 23 चेंडूत तुफान खेली करत 37 धावा केल्या. यावेळी 5 चौकार आणि एक षटकार देखील ठोकला. यंदाच्या हंगामाचा विचार करता दिनेशने 15 सामन्यात 64.80 च्या सरासरीने 324 रन केले आहेत. यात त्याने 22 षटकार आणि 27 चौकार लगावले आहेत.  


आजही दिनेशकडून संघाला अपेक्षा


आज आरसीबी संघाचा अत्यंत महत्त्वाचा सामना असून समोर तगड्या राजस्थान संघाचे आव्हान असणार आहे. त्यात आरसीबीचा यंदाच्या हंगामात एकप्रकारे पाठीचा कणा झालेल्या दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजीने दमदार कामगिरी केली आहे. लखनौविरुद्धही त्याने चांगली फलंदाजी केल्याने आज या महत्त्वाच्या सामन्यात त्याच्याकडून अनेकांना अपेक्षा असणार आहेत.  


हे देखील वाचा-