IPL 2022, RR vs RCB : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरातने अगदी दमदार कामगिरी करत सर्वात आधी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. ज्यानंतर आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या संघातील सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आयपीएलचा खिताॉब जिंकण्याचं स्वप्न इथेच संपणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त नक्कीच करतील. तर या महत्त्वाच्या सामन्याआधी दोन्ही संघ आपआपल्या अंतिम 11 मध्ये काही बदल करतील की आधीचाच संघ खेळवतील हे नाणेफेकीनंतर समजेल. पण आतापर्यंतचे सामने आणि दोन्ही संघाची त्यातील कामगिरी यावर कोणत्या 11 खेळाडूंना संधी मिळेल ते पाहूया...
दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11
राजस्थान - संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल
बंगळुरु - रजत पाटीदार, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माहिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज
मैदानाची स्थिती?
आजचा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानात पार पडणार आहे. अहमदाबादचं वातावरण पाहता याठिकाणी उष्णता अधिक असू शकते. सायंकाळी 29 अंश सेल्सियस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता असूनही खेळपट्टी पाहता चेंडूला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : पाटीदारचं शतक, हेजलवूडचा भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीचा विजय, लखनौचं आव्हान संपले
- Rajat Patidar : बंगळुरुला सामना जिंकवणारा रजत आधी होणार होता गोलंदाज, 'या' कारणामुळे बदलला निर्णय
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?