Tushar Deshpande : एमएस धोनीचा विश्वासू गोलंदाज, चेन्नईचा हुकमी एक्का तुषार देशपांडे आज विवाहबंधनात अडकला आहे. कल्याणमध्ये तुषार देशपांडे याचं लग्न पार पडलं. तुषार देशपांडे यानं नभा गडांमवार हिच्यसोबत लग्नगाठ बांधली. गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत तुषार देशपांडे याने भेदक मारा केला होता. चेन्नईच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. 



सीएसकेला आयपीएलची पाचवी ट्रॉफी मिळवून देण्यासाठी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याचे योगदान महत्वाचे राहिले. आयपीएल 2024 आधी तुषार देशपांडे क्लिन बोल्ड झाला आहे. आज गुरुवारी 21 डिसेंबर तुषार देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकला हे. सीएसकेला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर तुषार देशपांडे हा फॅशन डिझायनर नभा गंडांमवार हिच्यासोबत साखपुडा केला होता. आज तो लग्नबंधनत अडकलाय. कल्याणमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. 


आयपीएलच्या 16 व्या हंगामात तुषारने प्रभावी कामगिरी केली, तो पर्पल कॅपच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर होता. तुषारनं यंदाच्या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तुषार देशपांडेनं 16 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेत आपली छाप सोडली. सुरुवातीला तुषार देशपांडे महागडा ठरत होता. पण स्पर्धा उत्तार्धाकडे गेल्यानंतर तुषारने धावाही रोखल्या. महत्वाच्या सामन्यात तुषारने चेन्नईसाठी दमदार कामगिरी केली. दरम्यान, तुषार देशपांडे  नर्सरीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण कल्याण मधील केसी गांधी या शाळेत झालेले आहे. इयत्ता चौथीमध्ये असताना तुषारला 14 वर्षाखालील क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी या शाळेतून मिळाली. वेगवेगळ्या सामन्यांमध्ये संधी मिळाल्यामुळे आणि कोच चांगले मिळाल्यामुळे तुषारचा क्रिकेटचा पाया भक्कम तयार झाला. तुषार आज आयपीएल मध्ये खेळत आहे आणि त्यांनी रणजी ट्रॉफी खेळ देखील खेळला आहे. 


तुषार देशपांडे आज विवाह बंधनात अडकला. नभा गड्डमवार या कॉलेज मैत्रिणीशी त्याचा विवाह 21 डिसेंबर 2023 रोजी कल्याण पश्चिमेत संपन्न झाला. तुषार देशपांडे हा चेन्नई सुपर किंग्स कडून आयपीएल खेळला यामध्ये त्यांनी दमदार गोलंदाजी केली.  आणि यानंतर तो त्याच्या कॉलेजच्या गर्लफ्रेंड सोबत  त्याचा साखरपुडा झाला त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियामध्ये वायरल झाल्याने लग्नाची एकच चर्चा रंगली होती मात्र ही चर्चा आता क्षमली आहे. तुषार देशपांडे नभा या कॉलेजच्या गर्लफ्रेंड सोबत विवाह बंधनात अडकला आहे. विवाहाला   मार्गदर्शक, मित्र, आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधू-वरांस शुभ आशीर्वाद दिले. एकनाथ केरकर,ओंकार खानविलकर,इंदुलकर विनीत,ओंकार साळवी,अखिल हेरवाडकर,विनायक माने,प्रशांत सोलंकी,शिवम दुबे,धवल कुलकर्णी, भावीन ठक्कर, यांनी लग्नासाठी  हजेरी लावली. 


आणखी वाचा :


Exclusive : आईचं कॅन्सरने निधन, दुसऱ्याच दिवशी मैदानात, कल्याणमध्ये वाढला, आता धोनीचा प्रमुख शिलेदार; तुषार देशपांडेची धगधगती कहाणी