तुषार देशपांडेची 2007 साली मुंबईतील 13 वर्षाखालील मुलांच्या संघात निवड पाहता, तेव्हापासूनच त्याने क्रिकेट जगतात भरारी घेतली आहे. मात्र त्याची क्रिकेटच्या बाहेरीलही इनींगही थक्क करणारी आहे. मुंबई संघातून त्याने सहा रणजी सामने खेळाला. यामध्ये त्याने 185 षटके टाकली आणि 25.69 च्या सरासरीने 23 बळी घेतले होते. तर आता सुरु असलेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघातून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तुषारच्या गोलंदाजीने चेन्नई सुपर किंग्जला सतत विजयाला गवसणी घालत आहे. वानखेडे स्टेडियमवर तुषारने गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा बळी घेतला होता. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधील 19 विकेट्स घेऊन उत्तम गोलंदाज असल्याची पुन्हा चुणूक दाखवली आहे. तर दुसरीकडे मैदानाबाहेरही त्याची इनिंग थक्क करणारी आहे. 15 मे 1995 रोजी तुषारचा जन्म झाला तुषारचे वडील नोकरी करत आहेत तर आईचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले आहे.
तुषार मुंबईमध्ये सराव करत असताना मुंबईतील नामावंत प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेत त्याने गोलंदाजीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. तुषार कसून सराव करू लागला स्थानिक सामन्यांमध्ये तो यशस्वी कामगिरी करत होता. रणजी सामन्याच्या प्रशिक्षकांची नजर त्याच्यावर पडली आणि त्याला मुंबईच्या रणजी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. 2016-17 साली तुषार ने मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत प्रदार्पण केले. 2018 /19 च्या विजय हजारे करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत तुषारने पाच बळी घेत मुंबईला एक हाती सामना जिंकून दिला. त्याची ही कामगिरी लक्षात घेत दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला आयपीएल मधून खेळण्याची संधी दिली. नुकत्याच पार पडत असलेल्या आयपीएलच्या सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. भारताच्या संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी तुषार देशपांडे याचा प्रयत्न आहे.
कल्याणकर असणार्या तुषार देशपांडेचे वडील क्रिकेटर असल्याने त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. कल्याणच्या केसी गांधी शाळेत वयाच्या दहाव्या वर्षापासूनच 14 वर्षाआतील संघात क्रिकेटचा सामना खेळला असल्याचे केसी गांधी शाळेचे मुख्याध्यापक अशोक पटवर्धन यांनी सांगितले.
आईला कॅन्सरसारखा आजार झालेला असतांनाही आईची काळजी घेऊन तुषार क्रिकेटच्या सरावासाठी मैदानात जात होता. आईच्या निधनानंतर तुषार पोरका झाला होता मात्र वडिलांनी तुषारला खचून न जाता सीमेवर सैनिक घरचे दुःख विसरून देशासाठी लढतो त्याप्रमाणे घरातील दुःख विसरून क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांनी प्रोत्साहन दिले. तुषारच्या क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास कल्याणच्या केसी गांधी शाळेतून सुरू झाला. लहानपणापासूनच तो दररोज नित्यनियमाने कल्याणच्या वाहिले नगर येथील क्रिकेटच्या मैदानावर त्याने सराव केला. सुरुवाती पासूनच एक चांगला फलंदाज होण्याचे स्वप्न तुषार देशपांडेचे असल्याचे मत त्याच्या सोबत खेळणाऱ्या सहकार्याने सांगितले .
तुषार देशपांडे नर्सरीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण कल्याण मधील केसी गांधी या शाळेत झालेले आहे. इयत्ता चौथीमध्ये असताना तुषारला 14 वर्षाखालील क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी या शाळेतून मिळाली. वेगवेगळ्या सामन्यांमध्ये संधी मिळाल्यामुळे आणि कोच चांगले मिळाल्यामुळे तुषारचा क्रिकेटचा पाया भक्कम तयार झाला. तुषार आज आयपीएल मध्ये खेळत आहे आणि त्यांनी रणजी ट्रॉफी खेळ देखील खेळला आहे. त्यामुळे तुषारमुळे शहराच्या नावाबरोबरच शाळेचे नाव रोशन केले आहे.
शिवाजी पार्क जिमखाना येथे बारा वर्षाखालील वयोगटातील अकॅडमीसाठी सिलेक्शन सुरू होते. कल्याण मधून दहा ते बारा विद्यार्थ्यांना तुषारचे बाबा दादरला घेऊन गेले आणि तिथे तीन जनाची निवड झाली. त्या तिघांमध्ये तुषार चे नाव होते. तुषार आवडीने क्रिकेटचा सराव करत होता, मात्र आईला कॅन्सरचा आजार जडल्यामुळे आईच्या जेवणाची गोळ्या औषध देखभाल करून क्रिकेटच्या सरावासाठी जात असायचा. कॅन्सरच्या आजारामुळे आई या आजारातून बरी होणार नाही याची कल्पना तुषारला असतानाही तो कधी डगमगला नाही. त्याचे क्रिकेट वरचे लक्ष त्याने विचलित होऊ दिले नाही. 2019 मध्ये कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर त्याच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हा कुटुंबासाठी सर्वात मोठी परीक्षा होती. हा धक्का सहन करणे कठीण होते. “तो खूप अस्वस्थ झाला होता. आईच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीही तो इंदूरला मुश्ताक अली ट्रॉफी खेळायला गेला होता. आईचे निधन झाल्यानंतर खेळावरचं लक्ष विचलित होऊन द्यायचे नाही, त्याचप्रमाणे घरातला विषय बाहेर जाऊ द्यायचा नाही, असे संस्कार तुषार वर केल्यामुळे तुषार ने घरातला विषय बाहेर कधी काढला नाही. ग्राउंडर गेल्यानंतर सैनिकासारखे तुमचे वागणे असले पाहिजे, सैनिक सीमेवर गेल्यानंतर त्याला घरचे काही आठवत नाही, अशी माहिती तुषारच्या वडिलांनी दिली.