DC vs SRH, Fans Fight During Match : सध्या क्रिडाप्रेमींमध्ये आयपीएलचा (IPL 2023) फिवर पाहायला मिळत आहे. अनेक चाहते आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूंना पाठिंबा देताना दिसतात. यासाठी चाहते सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये पोहोचतात आणि खेळाडूंचा उत्साह वाढवतात. अशावेळी प्रतिस्पर्धी संघांच्या चाहत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं कधी-कधी दिसून येत. आयपीएल 2023 मधील असाच एक व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये स्टेडिअममधील प्रेक्षकांच्या बाचाबाची रुपांतर तुफान हाणामारीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे. क्रिकेटच्या मैदानावर फॅन्स आपापसातच भिडले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


आयपीएलमध्ये फॅन्समध्ये तुफान हाणामारी


हा व्हायरल व्हिडीओ आयपीलएल 2023 मध्ये शनिवारी (29 एप्रिल) पार पडलेल्या दिल्ली कॅपिट्लस आणि सनरायजर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यातील सामना दरम्यान असल्याचं समोर येत आहे. अरुण जेटली स्टेडियम म्हणजेच आधीच फिरोज शाह कोटला स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात आला. त्यावेळी फॅन्समध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही प्रेक्षक एकमेकांनी मारत असल्याचं दिसत आहे. अगदी लाथा-बुक्यांची तुंबळ हाणामारी झाल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये काही फॅन्सच्या हातात दिल्ली कॅपिटल्स संघाचा झेंडा दिसत आहे. पाच ते सात जण एकमेकांना लोळवून आणि केस धरून मारहण करताना दिसत आहेत.


पाहा व्हायरल व्हिडीओ : दिल्ली आणि हैदराबाद सामन्यादरम्यानचा Video व्हायरल






क्रिकेट की कुस्तीचा आखाडा


दरम्यान, मैदानावर दोन्ही संघ एकमेकांविरोधात उभे ठाकले असताना स्टेडिअममधील चाहते मारहाण करताना दिसत आहेत. काही जणांमध्ये हाणामारी सुरु असताना शेजारी उभे असलेले काही जण भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या मारहाणीचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या हा व्हिडीओ जोरदार चर्चेत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


हैदराबादचा दिल्लीवर नऊ धावांनी विजय


आयपीएल 2023 मध्ये 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्याच मैदानावर पराभव करत शानदार विजय मिळवला. हैदराबादने नऊ धावांनी हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने मागील सामन्यात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सनरायझर्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं, त्यानंतर यावेळी हैदराबादने दिल्ली संघावर त्यांच्या घरच्या मैदानावर मात केली. सनरायझर्सने हा सामना जिंकून यंदाच्या आयपीएल मोसमातील तिसरा विजय मिळवला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Team India : विराट कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कर्णधारपद? रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; रोहित शर्माबद्दल म्हणाले...