Team India Captaincy Virat Kohli vs Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधारपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थिती संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे देता येई शकतं, असं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं आहे. शास्त्री यांनी म्हटलं आहे की, जर टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही कारणास्तव कोणताही सामना खेळत नसेल, तर अशा परिस्थितीत त्या सामन्याचे महत्त्व लक्षात घेत विराट कोहलीला संघाचं कर्णधारपद दिलं पाहिजे. 


''विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवायला हवं''


भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही कारणास्तव उपलब्ध नसल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवायला हवं, असं मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय.


विराट कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कमान?


शास्त्री पुढे म्हणाले की, भारतीय संघ व्यवस्थापनाने गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्याच्या पुढे ढकलण्यात आलेल्या शेवटच्या कसोटीत कोहलीला संघाचे नेतृत्व करण्यास सांगायला हवं होतं. या रोहित त्या सामन्यासाठी उपलब्ध नसताना दौऱ्यातील शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला होता.  


''भारतीय संघाने विचार केला पाहिजे''


शास्त्री यांनी ESPNcricinfo ला सांगितलं की, "वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी रोहित तंदुरुस्त असावा असंच मला वाटतं कारण तो कर्णधार आहे, पण जर तो कोणत्याही कारणाने खेळू शकत नसेल तर भारतीय संघाने त्या दिशेने विचार केला पाहिजे. शास्त्री म्हणाले की, इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतही असेच करायला हवं होतं."






भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया WTC फायनल


इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून भारतीय विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC) अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने 24 एप्रिल रोजी टीम इंडियाची घोषणाही केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ICC World Test Championship Final : संघ ठरले, ठिकाण ठरलं अन् दिवसही; आता मैदान कोण मारणार? टीम इंडिया की, टीम ऑस्ट्रेलिया