Rohit Sharma Records IPL : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) आज वाढदिवस आहे. 'हिटमॅन' (Hitman) आज 36 वर्षांचा झाला आहे. टीम इंडियाचं तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्त्व करणाऱ्या रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. रोहित (RO-HIT) ने त्याच्या नावाला साजेशी अशी हिट कामगिरी केली आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.


आयपीएलमध्ये 'हिटमॅनची' ऐतिहासिक कामगिरी


आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्त्व करतो. मुंबई इंडियन्स संघ पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरला आहे. 2013 साली मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक वेळा टी20 लीग जिंकण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहित आयपीएल 2013 पासून मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असून यंदा कर्णधार म्हणून त्याचा आयपीएलचा दहावा हंगाम आहे.


1. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार


2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रोहिता शर्मा खेळत आहे. रोहित सुरुवातीला डेक्कन चार्जर्स संघाचा खेळाडू होता. त्यानंतर त्याला मुंबई संघात संधी मिळाली. तेव्हापासून तो मुंबई संघाचा भाग आहे. 2013 पासून मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई इंडियन्स हा पाच वेळ आयपीएल चॅम्पियन ठरलेला एकमेव संघ आहे. 


2. रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण


आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ही कामगिरी करणारा रोहित शर्मा आयपीएलमदील चौथा खेळाडू ठरला आहे. रोहितने सामन्याच्या 2.2 षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर चौकार मात आयपीएलमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या.


3. हिटमॅनची हॅटट्रिक


रोहित शर्माची झंझावाती फलंदाजी सर्वांनाच माहिती आहे, पण काही वर्षांपूर्वी रोहित शर्माही एक उत्तम फिरकी गोलंदाज होता हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्याने आयपीएलमध्ये हॅटट्रिकही केली आहे. जो पराक्रम आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजही करू शकले नाहीत. हिटमॅनने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. त्याने सलग तीन चेंडूत अभिषेक नायर, हरभजन सिंह आणि जेपी ड्युमिनीला बाद केलं. याशिवाय आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला फलंदाज आहे.


4. प्रत्येक हंगामात अर्धशतकी खेळी


आयपीएल लीगला 2008 साली  सुरुवात झाली. रोहित सुरुवातीची काही वर्षे डेक्कन चार्जर्सचा भाग होता. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात रोहित शर्मानं अर्धशतक ठोकलं आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळल्या गेलेल्या सर्व मोसमात रोहितनं किमान एका सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. रोहितशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाचा हा पराक्रम करता आलेला नाही.


5. हा अनोखा विक्रमही रोहितच्या नावे


आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नाव एक अनोखा विक्रमही आहे. आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात रोहित एक धावा काढून बाद झाला. यासोबतच त्याच्या नावे एका नकोसा विक्रमाचीही नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात 0 ते 5 धावा काढून तंबूत परणाऱ्या खेळाडूमध्ये हिटमॅन अव्वल आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 0-5 धावांमध्ये बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर हा विचित्र विक्रमही आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Team India : विराट कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कर्णधारपद? रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; रोहित शर्माबद्दल म्हणाले...