DC Vs KKR, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Delhi Capitals Vs Kolkata Knights Riders) यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सामन्यात दिल्लीच्या संघानं चार विकेट्स राखून कोलकात्यावर विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे, दिल्लीच्या संघानं आतापर्यंत आठ सामने खेळले. त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला. या चारही सामन्यात कुलदीप यादव सामनावीर ठरलाय.
कुलदीप यादवनं एकट्या जीवावर दिल्लीच्या संघाला विजय मिळवून देत आहे. दिल्लीनं यंदाच्या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर, इतर चार सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. परंतु, जिंकलेल्या चारही सामन्यात कुलदीप यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलंय. कुलदीप यादव दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरत आहे.
कुलदीप यादवची जबरदस्त कामगिरी
दिल्लीचा कोलकाताविरुद्ध 4 विकेट्सनं विजय- कुलदीपनं 14 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा पंजाब किंग्जविरुद्ध 9 विकेट्सनं विजय- कुलदीपनं 24 धावा देत 2 महत्वाचे विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा कोलकाताविरुद्ध 44 धावांनी विजय- कुलदीपनं 35 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 विकेट्सनं विजय- कुलदीपनं 18 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा कोलकात्यावर चार विकेट्सनं विजय
दिल्लीविरुद्ध नाणेफेक गमवल्यानंतर कोलकात्याचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. दरम्यान, कोलकात्याच्या संघानं 20 षटकात 9 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. कोलकात्यानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघानं 4 विकेट्स राखून विजय मिळवला. दिल्लीच्या सलामीवीर डेव्हिड वार्नरनं 26 चेंडूत तडाखेबाजी खेळी करत 42 धावा केल्या.
हे देखील वाचा-