PBKS vs LSG, 2022 : आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी 42 वा सामना खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये पुण्याच्या एमसीए मैदानावर सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालाली लखनौ टीम लयीत दिसत आहे. दुसरीकडे पंजाबने कसबसं स्वत:चं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल...हे दोन मित्र शुक्रवारी आयपीएलच्या मैदानात एक दुसऱ्याविरोधात उभे राहणार आहेत. राहुलच्या नेतृत्वातील लखनौच्या संघाने पाच विजय मिळवले आहेत. लखनौला तीन पराभवाला सामोरं जावे लागलेय. लखनौचा संघ 10 गुणांसह चौथ्या क्रमांकवर आहे. तर पंजाबचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबच्या संघाने आठ सामन्यात चार विजय मिळवले आहेत. 


पंजाब किंग्सची संभावित प्लेइंग 11 : मयंक अग्रवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिविंगस्टोन, जॉनी बेयरस्टो, जितेश वर्मा, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह


लखनऊ सुपर जायंट्सची संभावित प्लेइंग 11 : क्विंटन डिकॉक, लोकेश राहुल, मनिष पांडेय, मार्कस स्टोयनिस, क्रुणाल पांड्या, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, जेसन होल्डर, मोहसीन खान, दुष्मंथ चमीरा, रवी बिश्नोई


कधी आहे सामना?
आज 29 एप्रिल रोजी होणारा पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.


कुठे आहे सामना?
पंजाब आणि लखनौ यांच्यातील सामना पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?
पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.