IPL 2023, DC vs GT : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गुजरात विरुद्ध दिल्ली यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. गुजरात टायटन्स सध्या आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तर दिल्ली कॅपिटल्स सध्या गुणतालिकेत सर्वात तळाशी दहाव्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या या मोसमात आठ सामने खेळले यामध्ये संघाने सहा सामने जिंकले तर दिल्ली कॅपिटल्सनेही या हंगामात आठ सामने खेळले ज्यात संघाला फक्त दोन सामने जिंकता आले.


IPL 2023, DC vs GT : दिल्ली आणि गुजरात आमनेसामने


आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय झाल्यासं संघासाठी प्लेऑफचं दार खुलं होईल आणि दिल्लीचा पराभव झाल्यास संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर जाईल. अशा स्थितीत आजच्या सामन्यात दिल्लीचा संघ आज जोर मारण्याचा प्रयत्न करेल.


IPL 2023, DC vs GT : हेड टू हेडमध्ये कुणाचं पारड जड?


आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन संघांमध्ये दोन सामने खेळवले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सकडून दिल्ली कॅपिटल्सला पराभव स्वीकारावा लागला आहे. आयपीएल 2022 मध्ये गुजरातने दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला आणि यंदाच्या हंगामात 4 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर 11 चेंडू आणि 6 गडी राखून विजय मिळवला.


IPL 2023, DC vs GT : दिल्ली बाजी पलटणार?


दिल्ली बाजी पलटणं अवघड आहे पण अशक्य नाही. मागील तीन-चार सामन्यांपासून दिल्ली संघात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. यापूर्वी या संघाची केवळ गोलंदाजी चांगली होत होती आणि वॉर्नर वगळता सर्वजण फलंदाजीत फ्लॉप होत होते. आता काही खेळाडूंची दमदार फलंदाजी पाहायला मिळत आहे. सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. अक्षर पटेलनेही काही चांगल्या खेळी केल्या आहेत. अशा वेळी आज गुजरात विरुद्धच्या सामन्यात दिल्लीची फलंदाजी चालली तर उर्वरित काम गोलंदाजांना पूर्ण करता येईल.


GT vs DC Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


GT Probable Playing 11 : गुजरात टायटन्स


शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, आर तेवतिया, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, नूर अहमद.


DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, मिशेल मार्श, रिपल पटेल, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), एनरीच नॉर्टजे, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Brian Lara : दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा आयपीएल 2011 मध्ये अनसोल्ड, आता हैदराबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक