Brian Lara Birthday : दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा (Brian Lara) आज 54 वा (02 मे) वाढदिवस आहे. ब्रायन लारा हा त्याच्या काळातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक होता. त्याने वेस्ट इंडिज संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात (IPL 2023) लारावर सनरायजर्स हैदराबाद संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी आहे. पण हा ब्रायने लारा एकेकाळी आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला होता.


ब्रायन लारा आयपीएल 2011 मध्ये अनसोल्ड


आयपीएलच्या एका हंगामात ब्रायल लाराला दहापैकी एकाही संघाने विकत घेतलं नव्हतं. आयीपएल 2011 च्या लिलावात ब्रायन लारा अनसोल्ड होता. त्याची मूळ किंमत 4 लाख डॉलर म्हणजे सुमारे 3,27,35,800 रुपये होती. पण त्याला कोणत्याही संघानं विकत घेतलं नव्हतं.


धडाकेबाद फलंदाज ब्रायन लारा


दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा जन्म 2 मे 1969 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरेबियन देशात झाला. ब्रायन लाराला आतापर्यंतच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक खेळाडू आहे. ब्रेन लारा हा वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू आहे. तो 17 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. त्याने एकदिवसीय, T20 आणि कसोटीमध्ये वेस्ट इंडिज संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 1990 या 2017 काळात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. लाराने 131 सामन्यांमध्ये 11953 धावा केल्या. तर 299 वनडे सामन्यांमध्ये 10405 धावा केल्या आहेत. 


ब्रायन लारा हैदराबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक


आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला (IPL Season 16) सुरुवात होण्यापूर्वी सनरायजर्स हैदराबादनं वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराकडं (Brian Lara) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली. माजी मुख्य प्रशिक्षक टॉम मूडीज आणि सनरायजर्स हैदराबाद संघानं परस्पर संमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर गेल्या मोसमात संघाचा धोरणात्मक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या लाराला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं.


ब्रायन लाराची कारकिर्द


ब्रायन लारानं त्याच्या कारकिर्दीत 133 कसोटी आणि आणि 299 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटीत 34 शतके आणि 48 अर्धशतकांसह 11 हजार 953 धावा केल्या आहेत. ज्यात दोन द्विशतकाचाही समावेश आहे. त्यानं 1994 मध्ये इंग्लंडविरुद्ध 375 आणि 2004 मध्ये 400 धावांची नाबाद खेळी खेळली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. कसोटी क्रिकेटमध्ये 400 करण्याचा विक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ब्रायन लाराच्या नावावर 10 हजार 405 धावांची नोंद आहे. ज्यात 19 शतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 53 शतकांसह 22 हजार 358 धावा केल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Brian Lara Birthday : 501 धावांची नाबाद खेळी! ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, हा विक्रम मोडणं अवघड