CSK vs GT, IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 62 व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सवर (CSK vs GT) 7 गडी राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने केवळ 134 धावांचे माफक आव्हान गुजरातला दिले. गुजरातच्या रिद्धिमान साहाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान 19.1 षटकात गुजरातने केवळ तीन गडी गमावून पूर्ण केले. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


CSK vs GT 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. पण आज मात्र चेन्नईने नाणेफेक जिंकूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांनी घेतलेला फलंदाजीचा निर्णय चुकला.

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज गुजरातच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत चेन्नईला अवघ्या 133 धावांवर रोखलं. शमीने यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. 

  3. पहिली फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात खराब झाली अवघ्या 5 धावा करुन कॉन्वे बाद झाला. 

  4. कॉन्वे बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण साई किशोर याने मोईन अलीला बाद करत गुजरातला दुसरे यश मिळवून दिले. मोईन अलीने 21 धावांची खेळी केली. 

  5. त्यानंतर गायकवाडने 49 चेंडूत 53 धावांची खेळी केली. राशिद खान याने गायकवाडचा अडथळा दूर केला. अखेरच्या काही षटकात जगदीशन याने 33 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 133 धावांपर्यंत नेली.

  6. गुजरातकडून मोहम्मद शामीने चार षटाकत फक्त 19 धावा खर्च करत महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्याने दोन षटकात फक्त आठ धावा खर्च केल्या.

  7. 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरात संघाने साहा आणि गिल जोडीच्या मदतीने चांगली सुरुवात केली.

  8. पण पाथिराना याने गिलला 18 धावांवर बाद करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर मोईनने मॅथ्यू वेडलाही 20 धावांवर बाद केलं. पण साहा दमदार खेळी करतच होता.

  9. कर्णधार हार्दिक 7 धावा करुन बाद झाला पण मिलरने नाबाद 15 धावा ठोकत संघाचा विजय पक्का केला. 

  10. यावेळी साहा याने 57 चेंडूत नाबाद 67 धावा करत संघाला विजय मिळवून दिलं. साहाने यावेळी 8 चौकार आणि एक षटकार ठोकला.


हे ही वाचा -