CSK vs DC, IPL 2023 Live: दिल्लीपुढे चेन्नईचे आव्हान, प्रत्येक लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

CSK vs DC, IPL 2023 : दिल्ली स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवणार का ?

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 10 May 2023 11:15 PM
चेन्नईचा दिल्लीवर 27 धावांनी विजय

चेन्नईचा दिल्लीवर 27 धावांनी विजय

ललीत यादव बाद

ललीत यादव बाद

रिपल पटेल बाद

रिपल पटेल बाद झालाय. चेन्नईला आठवा धक्का

दिल्लीला सातवा धक्का

अक्षर पटेलच्या रुपाने दिल्लीला सातवा धक्का बसला.. 

दिल्लीचा अर्धा संघ तंबूत

दिल्लीचा अर्धा संघ तंबूत परतलाय. वॅन रुसी यालाही बाद केलेय

दिल्लीला चौथा धक्का

मनिष पांडे बाद.. दिल्लीला चौथा धक्का

दिल्लीला तिसरा धक्का

मिचेल मार्शच्या रुपाने दिल्लीला तिसरा धक्का बसलाय... मार्श धावबाद झालाय

दिल्लीला दुसरा धक्का

साल्टच्या रुपाने दिल्लीला दुसरा धक्का बसलाय.

दिल्लीला पहिला धक्का

डेविड वॉर्नरच्या रुपाने दिल्लीला पहिला धक्का बसलाय. दीपक चहरने वॉर्नरचा अडथळा दूर केला.

धोनी-जाडेजाने डाव सावरला

रायडू आणि दुबे बाद झाल्यानंतर जाडेजा आणि धोनीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी झटपट धावांचा पाऊस पाडला. धोनी आणि जाडेजा यांनी 18 चेंडूत 38 धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी होय. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रविंद्र जाडेजाने 16 चेंडूत 21 धावांचे योगदान दिलेय. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. धोनीने 9 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. धोनी आणि जाडेजा यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे चेन्नईचा डाव 167 पर्यंत पोहचला. 

दिल्लीची गोलंदाजी कशी?

दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पहिल्या चेंडूपासून दिल्लीकरांनी अचूक टप्प्यावर मारा केला. मिचेल मार्श याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मिचेल मार्श याने तीन षटकात 18 धावांच्या मोबदल्यात तीन फंलदाजांना तंबूत पाठवले. अक्षर पटेल याने दोन विकेट घेतल्या आहेत. तर खलील अहमद, ललीत यादव आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

चेन्नईची 167 धावांपर्यंत मजल

चेन्नईची 167 धावांपर्यंत मजल

चेन्नईला आठवा धक्का

धोनीच्या रुपाने चेन्नईला आठवा धक्का बसलाय

चेन्नईला सातवा धक्का

रविंद्र जाडेजाच्या रुपाने चेन्नईला सातवा धक्का बसलाय. जाडेजा 21 धावांवर बाद झाला.

चेन्नईला सहावा धक्का

अंबाती रायडूच्या रुपाने चेन्नईला सहावा धक्का बसलाय

चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

मिचेल मार्शने शिवम दुबेला बाद करत चेन्नईला पाचवा धक्का दिला. दुबे 25 धावा काढून बाद झाला

रहाणे-मोईन अली बाद

अक्षर पटेल याच्यानंतर कुलदीप यादव आणि ललीत यादव यांनी चेन्नईच्या अडचणी वाढवल्यात... अजिंक्य रहाणेला ललीत यादवने तंबूत धाडले तर  मोईल अलीचा अडथळा कुलदीपने दूर केला.. चेन्ई 14 षटकानंतर चार बाद 112 धावा

चेन्नईला दुसरा धक्का

ऋतुराज गायकवाडच्या रुपाने चेन्नईला दुसरा धक्का बसलाय. अक्षर पटेलने घेतली विकेट

चेन्नईला पहिला धक्का

डेवन कॉनवेच्या रुपाने चेन्नईला पहिला धक्का बसलाय. अक्षर पटेलने कॉनवेला पाठवले तंबूत

गायकवाड-कॉनवे फलंदाजीसाठी मैदानात

गायकवाड-कॉनवे फलंदाजीसाठी मैदानात

ललीत यादव, रायडू आत; मनिष पांडे, दुबे बाहेर...

CSK vs DC Playing 11 And Toss Update : चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेपॉकच्या मैदानावर धोनीने पाहुण्या दिल्लीला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. चेन्नईच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. धोनीने अंबाती रायडूला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. शिवम दुबे प्लेईंग 11 मध्ये नाही. तर दिल्लीने अष्टपैलू ललीत यादव याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. दिल्लीने मनीष पांडेला प्लेईंग 11 मधून बाहेर बसवलेय. पाहूयात दोन्ही संघांची प्लेईंग 11

CSK Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.

DC Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रुसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या मैदानावर (Pitch Report) फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील. 

CSK vs DC Head to Head : चेन्नई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ एकूण 27 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नईने 17 सामने जिंकले आहेत, तर दिल्ली संघाला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. 

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

CSK vs DC, IPL 2023 : कुणाचं पारड जड?

यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नंतर चेन्नईनं दमदार कमबॅक केलं आणि आता संघ प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचला आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आलेली नाही. सुरुवातीपासूनच संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत चेन्नई संघ 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने 11 पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर चार सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. दिल्ली कॅपिट्ल्स दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने त्यांच्या 10 पैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. संघांकडे आठ गुण आहेत.

पार्श्वभूमी

CSK vs DC, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 55 व्या सामन्यात आज चेन्नई आणि दिल्ली (DC vs CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या घरच्या चैपॉक मैदानावर (Chepauk Stadium) 10 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यात विजय मिळवल्यानंतर आज मैदानात उतरतील. दोन्ही संघ विजयी मार्गावर कायम राहण्याचा प्रयत्न करतील. प्लेऑफमध्ये स्थान कायम राखण्यासाठी चेन्नई (Chennai Super Kings) संघांसाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. तर दिल्ली (Delhi Capitals) संघांची मागील काही सामन्यांतील कामगिरी पाहता दिल्ली कॅपिटल्स आजचा सामना जिंकून बाजी पलटण्याचा प्रयत्न करेल.

CSK vs DC, IPL 2023 : कुणाचं पारड जड?
यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नंतर चेन्नईनं दमदार कमबॅक केलं आणि आता संघ प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचला आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आलेली नाही. सुरुवातीपासूनच संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत चेन्नई संघ 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने 11 पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर चार सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. दिल्ली कॅपिट्ल्स दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने त्यांच्या 10 पैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. संघांकडे आठ गुण आहेत.

CSK vs DC Head to Head : मुंबई विरुद्ध बंगळुरु, हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ एकूण 27 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नईने 17 सामने जिंकले आहेत, तर दिल्ली संघाला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. 

MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या मैदानावर (Pitch Report) फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई (CSK) आणि दिल्ली (DC) यांच्यात आज 10 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवर (M. A. Chidambaram Stadium) म्हणजेच चेपॉक मैदानावर (Chepauk Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील. 

CSK vs DC Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11
CSK Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.

DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रुसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.