रायपूर : छत्तीसगडमधील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना नक्षलवादी (Naxlite) कारवायांमध्ये मोठं यश मिळालं आहे. राज्यातील नारायणपूर जिल्ह्याच्या दंतेवाडा बोर्डरवर सुरू सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असून 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे. दुपारी एक वाजताच्या सुमारास सुरक्षा यंत्रणा नक्षलवाद्यांच्या ठिकाणावर पोहोचल्या होत्या, त्यानंतर त्या सीमारेषेवर चकमक सुरू झाली असून यात आत्तापर्यंत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलंय. 


दंतेवाडा बॉर्डरवर नक्षलवाद्यांची कुमूक आल्याबाबत सुरक्षा यंत्रणांना खबऱ्यांकडून ⁠टिप ऑफ मिळाला होता, ⁠सध्या अंधार झालाय म्हणून गोळीबार थांबवण्यात आलं आहे. ⁠पण दोन्ही बाजूंनी सुरक्षा यंत्रणां पोझिशन घेऊनच थांबल्या आहेत. ⁠पोलिसांची खूप मोठी कुमक सध्या इथं तैनात आहे, जवळपास 600 पेक्षा जास्त जवान तैनात असून 6 ⁠नक्षली कंपन्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे, सुरक्षा जवान व नक्षल्यांमध्ये पहाटेपर्यंत चकमक सुरुच राहिल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.