एक्स्प्लोर

IPL Record : चेन्नई सुपर किंग्स 10 व्यांदा अंतिम फेरीत, चार वेळा चॅम्पियन CSK चा आतापर्यंतचा प्रवास पाहा

CSK Record in IPL : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या अंतिम फेरीत विक्रमी वेळा दहाव्यांदा धडक मारली आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आयपीएल चार वेळा आयपीएल चॅम्पियन ठरला आहे.

CSK Record in IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) क्वालिफायर 1 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने गुजरात टायटन्स संघाला पराभूत केलं. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. धोनीच्या चेन्नईनं गुजरातचा 15 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्स हा फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी 143 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. पण, गुजरातला केवळ 157 धावाच करता आल्या. मात्र, गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.

2010 साली चेन्नई संघ पहिल्यांदा विजेतेपद

चेन्नई संघ आयपीएलच्या पहिल्या मोसमात म्हणजे आयपीएल 2008 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीत चेन्नईचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2010 च्या अंतिम फेरीत पोहोचला आणि यावेळी संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. आयपीएल 2010 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. याशिवाय आयपीएल 2011 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2012 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. त्याशिवाय चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2013 मध्येही अंतिम फेरी गाठली होती, पण यावेळी पुन्हा त्यांची निराशा झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल 2013 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता.

चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा विजेतेपद पटकावणार?

चेन्नई संघ आयपीएल 2015 च्या फायनलमध्ये पोहोचले होते, परंतु मुंबई इंडियन्सकडून विजेतेपदाच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएल 2016 आणि आयपीएल 2017 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ खेळू शकला नव्हता. आयपीएल 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करत विजेतेपद पटकावलं. आयपीएल 2019 च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स संघ एका धावेनं पराभूत झाला. यानंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये पोहोचले. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावलं. आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आयपीएलमध्ये गुजरात पहिल्यांदा ऑल-आऊट

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्स संघाला ऑल-ऑऊट करणारा चेन्नई सुपर किंग्स हा पहिला संघ ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाने पांड्याच्या गुजरातला 25 धावांनी पराभव केला. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात आला. विशेष म्हणजे आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकूण 31 सामने खेळलेला गुजरात संघ पहिल्यांदा सर्व गडी बाद झाला. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सला पहिल्यांदा चेन्नईनं ऑल-आऊट केलं आहे.

चेन्नई संघ 10 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत

  • आयपीएल 2008 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभव
  • आयपीएल 2010 : मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय 
  • आयपीएल 2011 : आरसीबी विरुद्ध विजय 
  • आयपीएल 2012 : कोलकाता विरुद्ध पराभव
  • आयपीएल 2013 : मुंबई इंडियन्सकडून पराभव
  • आयपीएल 2015 : मुंबई इंडियन्सकडून पराभव
  • आयपीएल 2018 : सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध विजय
  • आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभव
  • आयपीएल 2021 : केकेआर विरुद्ध विजय

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhoni Retirement : 'माही' रिटायर्ड होणार? धोनीनं स्वतःच दिली सर्व प्रश्नांची उत्तरं, म्हणाला...

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Embed widget