IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम खूपच वेगळा असणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक महत्वाच्या खेळाडूला संघानं गमावलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामातही चेन्नईच्या संघावर प्रत्येकाची नजर असणार आहे. चेन्नईच्या संघ आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघापैकी एक आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या चार ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर, पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाची आतापर्यंत कामगिरी कशी राहिली? कोणत्या खेळाडूंवर सर्वांची नजर राहणार? याबाबत जाणून घेऊयात. 


आयपीएलच्या पहिला हंगाम 2008 मध्ये खेळण्यात आला होता. या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2010 मध्ये चेन्नईनं मुंबई इंडियन्सला धूळ चाखून पहिली ट्राफी जिंकली होती. 2011 मध्ये चेन्नईच्या संघानं त्यांची दुसरी ट्रॉफी जिंकली. 2016 आणि 2017 मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नईच्या संघावर दोन वर्षाची बंदी घालण्यात होती. त्यानंतर 2018 मध्ये सनरायझर्सला अंतिम सामन्यात पराभूत करून चेन्नईनं तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. परंतु, 2020 मध्ये चेन्नईला काही खास कामगिरी करता आली नाही. या हंगामात चेन्नईचा संघ प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकला नाही. मात्र, 2021 मध्ये महिंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उचलली.


या खेळाडूंच्या कामगिरीवर राहणार नजर


ऋतुराज गायकवाड
चेन्नईच्या संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आयपीएल 2021 आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यानं आयपीएलच्या मागील 2 हंगामात एकूण 22 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं शतकासह 839 धावा केल्या आहेत.


रविंद्र जाडेजा
स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा आयपीएलमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 सामने खेळले आहे. ज्यामध्ये त्यानं 2 हजार 386 धावा केल्या आहेत आणि 127 विकेट्स घेतले आहेत. त्यानं श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत त्यानं उत्कृष्ट कामगिरी केलीय. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये असून आयपीएलमध्ये मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. 


मोईन अली
चेन्नईचा अष्टपैलू मोईन अली हा देखील चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असल्याचं सिद्ध झालंय. ज्यामुळं चेन्नईच्या संघानं मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिटेन केलंय. त्यानं आयपीएलमध्ये 34 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं 666 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या मागच्या हंगामातील 15 सामन्यात त्यानं 357 धावा केल्या आहेत. तर, 6 विकेट्स घेतल्या आहेत. 


डेव्हन कॉनवे
न्यूझीलंडचा युवा खेळाडू डेव्हन कॉनवे आयपीएलच्या या मोसमात पदार्पण करू शकतो. त्यानं आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 20 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं 50.2 च्या सरासरीनं 602 धावा केल्या आहेत. सध्या तो टी-20 फॉरमेटमधील चांगला खेळाडू आहे. कॉनवे हा ऋतुराज गायकवाडसोबत चेन्नईसाठी सलामी देऊ शकतो.


राजवर्धन हंगरगेकर
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेते बनवण्यात अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकरचा मोलाचा वाटा होता. त्यानं गोलंदाजीनं नव्हेच तर, फलंदाजीनंही चांगली कामगिरी केलीय. यामुळं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला चेन्नईच्या संघानं 1.50 कोटीला विकत घेतलं. यावेळी तो आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha