IPL 2022 : आयपीएलमध्ये (IPL 2022) मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि युझवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. तर दुसरीकडे हैदराबाद संघ मात्र पहिल्याच सामन्यात पराभूत झाला आहे. तर नेमकी या पराभवामागे कोणती कारणे आहे, त्यावर एक नजर फिरवूया...  


1. भुवनेश्वरचा तो नो बॉल : सनरायजर्स गोलंदाजी करताना पहिल्यात षटकात भुवनेश्वरने दमदार गोलंदाजी केली.यावेळी त्याने केवळ एकच रन दिला. पण राजस्थानचा तगडा खेळाडू जोस बटलरला या ओव्हरमध्ये त्याने बाद केलं. पण तोच बॉल नो बॉल पडल्याने त्याला बाद घोषित करण्यात आलं नाही. त्यामुळे हैदराबादला मोठा तोटा झाला


2. हैदराबादचे फिरकीपटू फ्लॉप : वॉशिंग्टन सुंदर सनरायजर्सचा मुख्य फिरकीपटू असून तो कालच्या सामन्यात खास गोलंदाजी करु शकला नाही. त्याने तीन ओव्हरमध्ये एकूण 47 रन दिले. याउलट दुसरीकडे राजस्थानचे स्पिनर चहल आणि आश्विन यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.


3. राजस्थानची दमदार फलंदाजी : सामन्यात हैदराबादच्या सर्वच फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. सर्वांनी आपआपल्यापरीने योगदान देत संघाला 200 पार पोहोचवलं. यात  जॉस बटलरने 35, यशस्वी जैस्वालने 20, संजू सॅमसनने 55, देवदत्त पड्डीकलने (41) आणि शिमरोन हेटमायरने 32 धावा केल्या. ज्यामुळे राजस्थानने 210 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.


4. एडन मार्करमला वर खेळायला न पाठवणे : सनरायजर्सचा कर्णधार केन विलियमसनने एडन मार्करला पाचव्या क्रमांकावर खेळवले. त्याने संघासाठी नाबाद 57 धावा केल्या. पण तेच त्याला वरच्या फळीत खेळवले असते तर त्यानेकाही अधिक धावा धावफलकावर लावल्या असत्या 


5. केन विल्यमसनचा 'तो' झेल : हैदराबादचा कर्णधार अवघ्या 2 धावांवर असताना पहिल्याच ओव्हरमध्ये स्लीपमध्ये झेलबाद झाला. पण ही कॅच देवदत्त पड्डीकलच्या हातात जाताना काहीशी मैदानात लागल्या सारखं दिसत होतं. पण तरीदेखील विल्यमसना बाद करार देण्यात आल्याने हैदराबाद फॅन्स नाराज होते.


हे देखील वाचा-