RCB vs KKR : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या दोघांमध्ये सामना पार पडणार आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न होणार यात शंका नाही. पण याआधी दोन्ही संघाचे आयपीएल 2022 मधील सामन्यात कोलकात्याने एक विजय मिळवला आहे. तर आरसीबी मात्र पहिल्या सामन्यात पराभूत झाली आहे. 


दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या सामन्यात आज दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी पहिला सामना आणि सध्याच्या फॉर्मचा विचार करता नेमके कोणते खेळाडू मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया...


कोलकात्याची संभाव्य अंतिम 11  


वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), सुनील नारायण, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी 


बंगळुरुची संभाव्य अंतिम 11 


फाफ डुप्लेसीस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली. दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफन रुदरफोर्ड, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, आकाश दीप, मोहम्मद सिराज.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha