एक्स्प्लोर

IPL Final च्या राखीव दिवशी पाऊस पडणार का? पाहा अहमदाबादमधील हवामानाचा अंदाज

IPLच्या अंतिम सामन्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याला ब्रेक, प्रेक्षकांचा प्रचंड हिरमोड 

IPL Final 2023 : अहमदाबादमध्ये आज पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसाच्या ख्वाडामुळे आयपीएलचा महाअंतिम सामनाही होऊ शकला नाही. संततधार पावसामुळे आज एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. नाणेफेकही झाली नाही. आता सोमवारी सामना होणार आहे. पण सोमवारी पावसाने हजेरी लावली तर... अहमदाबादमध्ये सोमवारी हवामान कसे आहे.. काय सांगतो हवामानाचा अंदाज... 

सोमवारी अहमदाबादचे हवामान कसे आहे ?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. accuweather संकेतस्थळानुसार, अहमदाबादमध्ये सोमवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान अहमदाबादमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. संकेतस्थळानुसार, संध्याकाळी सात ते दहा वाजता पावसाची शक्यता आठ टक्के वर्तवण्यात आली आहे. तर रात्री 11 वाजता पावसाची शक्यता 20 टक्के इतकी आहे. त्यामुळे सोमवारीही फायनलवर पावसाचे सावट आहे. हवामान ढगाळ असून पावसाची अंधूक शक्यता नाकारता येत नाही. पाहा सोमवारी कसे असेल वातावरण.... 

IPL Final च्या राखीव दिवशी पाऊस पडणार का? पाहा अहमदाबादमधील हवामानाचा अंदाज

(सौजन्य : accuweather )

उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रात धो धो -
29 मे रोजी उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  बनासकांठा, पाटन, मेहसाणा आणि साबरकांठा येथे वादळी पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय राजकोट, अमरेली, भावनगर आणि कच्छ येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   

अहमदाबादमध्ये कसे असेल सोमवारी हवमान
IPL Final च्या राखीव दिवशी पाऊस पडणार का? पाहा अहमदाबादमधील हवामानाचा अंदाज

(सौजन्य - hi.meteocast.net)

सोमवारीही पाऊस थांबला नाही तर विजेता कोण ?
आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण?  धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. पण अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे आज सामना झाला नाही. जवळपास चार ते पाच तास इथं जोरदार पाऊस पडला. पंचांनी रात्री 11 वाजेपर्यंत सामना सुरु होण्याची वाट पाहिली.. पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झालाय. आता राखीव दिवशी, म्हणजेच सोमवारी आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. पण सोमवारी पावसाने उसंत घेतली नाही, तर गुजरातला जेतेपद देण्यात येणार आहे. कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. 

यंदाच्या मोसमात हार्दिक आणि धोनीच्या दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकणार होत्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा IPL सामना ठरण्याची शक्यता आहे.. त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी IPL च्या फायनलमध्ये धडक मारलीय. IPL च्या मागच्या मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं. यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहील. पण चारवेळा IPL जिंकणाऱ्या चेन्नईचं यंदा गुजरातसमोर तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर IPL च्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत...एकीकडे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला लागलीय.. मात्र दुसरीकडे सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget