एक्स्प्लोर

IPL : कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या नावे अनोखा विक्रम

कोलकाता:  आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नावे अनोखा विक्रम जमा झाला.   ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरने पंजाबवर 7 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.   या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताने निर्धारित 20 षटकात 3 बाद 164 धावा केल्या होत्या. कोलकाताचे जे तीन फलंदाज बाद झाले, ते धावबादच झाले. त्यामुळे विरोधी संघाचा एकही फलंदाज बाद न करण्याचा अनोखा विक्रम पंजाबच्या गोलंदाजांवर जमा झाला.   कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेल हे तीन खेळाडू बाद झाले. उथप्पाने स्क्वेअरला चेंडू मारल्यानंतर तो मॅक्सवेलने मोठ्या चपळाईने अडवला. तोपर्यंत गंभीरने क्रिज सोडली होती. गंभीरला परत नॉनस्ट्राईक क्रिजला पोहचायला अपयश आल्यामुळे गोलंदाजी करत असलेल्या संदीप शर्माने गंभीरला रनआऊट केले. उथप्पाच्या बाबतीतही तेच झाले. मोहित शर्माने उथप्पाला रनआऊट केले. तर संदीप शर्मानेच पुन्हा रसेलला रनआऊट केले.   या व्यतिरिक्त पंजाबच्या गोलंदाजांना कोलकाताची एकही विकेट घेता आली नाही. पण पंजाबच्या क्षेत्ररक्षकांमुळे कोलकाताला 164 धावांतच रोखता आलं.   सतत पराभवाचा सामना करत असलेल्या पंजाबने कर्णधारपदाची धुरा मुरली विजयकडे सोपवली आहे. त्यानंतर तरी संघात नवचैतन्य येईल अशी अपेक्षा होती. त्यातच गुणतालिकेत सर्वात वरच्या क्रमांकावर असलेल्या गुजरात लायन्सला पराभूत केल्यामुळे मुरली विजयकडून अपेक्षा वाढल्या होत्या.  मात्र, केकेआर विरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी फॅन्सची साफ निराशा केली.   दरम्यान, पंजाबला 20 षटकांत 9 बाद 156 धावांच करता आल्यामुळे ते विजयापासून 7 धावा दूर राहिले.

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 Update : निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
निर्णायक सामन्याचा निकाल लागला! नमन धीर-इशान किशननं मैदान गाजवलं, अन्... भारत-वेस्ट इंडिजच्या पाचव्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20 : बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
बंगळुरुमध्ये पावसाचा हाहाकार! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना 5 षटकांचा होणार? जाणून घ्या डेडलाईन
Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget