IPL Auction 2021 LIVE UPDATES : एम. सिद्धार्थ सोल्ड, 20 लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

IPL Auction 2021 LIVE Streaming Updates: क्रिकेटप्रेमी भारत देशामध्ये या खेळाप्रती असणारं वेड काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अशा या देशात आयपीएल स्पर्धेला असणारी लोकप्रियता हीसुद्धा तितकीच कमाल. यंदाच्या वर्षी आगामी क्रिकेट सामन्यांपवर क्रिकेट विश्वाचं लक्ष असतानाच आयपीएलच्या लिलावाकडेही सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आयपीएलसाठी खेळाडूंचा चेन्नईमध्ये लिलाव सुरु झाला आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2021 05:48 PM
IPL Auction 2021: रजत पाटीदारवरही आरसीबीकडून 20 लाखांची बोली.
IPL Auction 2021: युवा भारतीय खेळाडू सचिन बेबीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत केलं खरेदी.
IPL Auction 2021: भारताचा अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावला मुंबई इंडियन्सने 2.40 कोटींमध्ये विकत घेतला आहे. गत सत्रात चावला चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता.
IPL Auction 2021: भारताचा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग अद्याप अनसोल्ड. त्याची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे. न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोढीचीही लिलावात विक्री झाली नाही.
IPL Auction 2021: भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला दिल्ली कॅपिटल्सने मूळ किंमत एक कोटीलाच खरेदी केलं. त्याचवेळी वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेलला अद्याप कोणताही खरेदीदार सापडलेला नाही.
IPL Auction 2021: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलला मुंबई इंडियन्सने पाच कोटींमध्ये खरेदी केले आहे. आयपीएल 2020 मध्येही कुल्टर नाईल मुंबई संघाचा सदस्य होता.
IPL Auction 2021: पंजाब किंग्जने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनसाठी 14 कोटी मोजले. 24 वर्षीय गोलंदाज अद्याप आयपीएलमध्ये खेळला नाही. रिचर्डसनची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.
IPL Auction 2021: बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला राजस्थान रॉयल्सने एक कोटी रुपयात विकत घेतले आहे. याआधीही आयपीएलमध्ये मुस्ताफिजर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता.
IPL Auction 2021: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्नेला मुंबई इंडियन्सने 3.20 कोटींमध्ये विकत घेतले. मिल्नेची बेस प्राईज 50 लाख रुपये होती.
IPL Auction 2021: न्यूझीलंडचा स्फोटक यष्टिरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप अनसोल्ड. त्याची बेस प्राईज 50 लाख रुपये होती. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीलाही कोणताही खरेदीदार सापडला नाही. कॅरीची बेस प्राईज बक्षीस 1.50 कोटी रुपये होती.
IPL Auction 2021: लिलाव दरम्यान दिल्ली कॅपिटलचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ म्हणाले, "स्टीव्ह स्मिथला विकत घेतल्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. आम्ही त्याचा फॉर्म पाहून नाही तर अनुभवाच्या आधारे खरेदी केलंय. रिकी पॉन्टिंग देखील खूप खूष आहे. त्याने फोन करून आनंद व्यक्त केला. "
आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू - ख्रिस मॉरिस : 16.25 कोटी, राजस्थान रॉयल्स - 2021, युवराज सिंह : 16 कोटी, दिल्ली डेअरडेव्हिल्स - 2015, पॅट कमिन्स : 15.5 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स - 2020, बेन स्टोक्स : 14.5 कोटी, रायझिंग पुणे सुपरजायंट्स - 2017, ग्लेन मॅक्सवेल : 14.25 कोटी, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर - 2021
दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आता राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात, मॉरिसला 75 लाखांच्या मूळ किमतीवरून 16.25 कोटीचा चढा भाव
IPL Auction 2021: इंग्लंडचा टॉप ऑर्डर फलंदाज डेव्हिड मालनला पंजाब किंग्जने 1.50 कोटींमध्ये विकत घेतले. मालन सध्या टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
IPL Auction 2021: करुण नायर, केदार जाधव, जेसन रॉय आणि अ‍ॅलेक्स हेल्स या बड्या खेळाडूंना लिलावात कोणतेही खरेदीदार सापडलेले नाही. ते आत्ता दुसर्‍या सेटमध्ये विकले जाऊ शकतात.
IPL Auction 2021: बांगलादेशचा फिरकी अष्टपैलू शाकिब अल हसनला कोलकाता नाईट रायडर्सने 3.20 कोटींमध्ये खरेदी केली आहे. गेल्या वर्षी साकिब या लीगचा भाग नव्हता. शाकिबचे बेस किंमत दोन कोटी रुपये होती.
IPL Auction 2021: इंग्लंडचा स्पिन अष्टपैलू मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्जने सात कोटी रुपयांत विकत घेतले आहे. मोईन आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य होता. परंतु, आता तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळताना दिसणार आहे.
IPL Auction 2021: भारताचा युवा अष्टपैलू शिवम दुबे राजस्थान रॉयल्सने 4.40 कोटींमध्ये खरेदी केला आहे. शिवम आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा सदस्य होता. शिवमने भारताकडून एकदिवसीय आणि 12 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
IPL Auction 2021: ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14.25 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने मॅक्सवेल विकत घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण पैसे नसल्यामुळे त्यांना हा खेळाडू विकत घेता आला नाही.
IPL Auction 2021: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचही अजून अनसोल्ड. मागील हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा सदस्य होता.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा यशस्वी बोली लागलेला पहिला खेळाडू, दिल्ली कॅपिटल्सकडून 2.20 कोटी रुपयांकडून खरेदी
IPL Auction 2021: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने यावर्षी लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. मार्क वुडची बेस किंमत दोन कोटी रुपये होती. मार्क वुडवर मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि किंग्ज इलेव्हन पंजाबची नजर होती. लिलावात वुडला मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण कुटुंबाला प्राधान्य देण्याचे त्याने ठरवले.
राजस्थान रॉयल्सने आपला कर्णधार स्टीव्ह स्मिथला आयपीएल 2021 च्या लिलावाआधी रिलिज केलं आहे. स्टीव्ह स्मिथनं आयपीएल 2020 च्या 14 सामन्यांमध्ये 311 धावा केल्या होत्या. .त्यानंतरही स्टीव्ह स्मिथला आयपीएल 2021 च्या लिलावात सर्वाधिक रक्कर मिळू शकते. आयपीएलमध्ये स्टीव्ह स्मिथचं करिअर जबरदस्त राहिलं आहे. त्यानं आयपीएलमध्ये 95 सामन्यात 35.34 च्या सरासरीनं 2333 धावा केल्या आहेत.

IPL Auction 2021: ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला दिल्लीच्या कॅपिटलने 2.20 कोटींमध्ये खरेदी केले आहे. स्मिथ पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य होता.
ऑस्ट्रेलियाचा धाकड खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडेही सर्वांचं लक्ष असेल. मागील 2020 च्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेलचं प्रदर्शन अत्यंत खराब राहिलं होतं. एकही षटकार त्यानं लावला नव्हता. यानंतर आयपीएल 2021 साठी किंग्स इलेवन पंजाबने त्याला रिलिज केलं आहे. आता आयपीएल भारतात होणार आहे. अशात ग्लेन मॅक्सवेलवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात ग्लेन मॅक्सवेलची बेस प्राईज दोन करोड रुपये आहे.

आयसीसी टी20 इंटरनेशनल रॅंकिंगमध्ये जगात नंबर वन असलेला फलंदाज डेविड मलानवर पैशांची बरसात होऊ शकते. मलानची बेस प्राईज दीड करोड रुपये आहे. टी 20 मध्ये मलानचं प्रदर्शन जबरदस्त राहिलेलं आहे. मलाननं इंग्लंडकडून खेळताना 19 टी20 सामन्यात 53.44 च्या सरासरीनं आणि 150 च्या स्ट्राईक रेटनं 855 धावा बनवल्या आहेत. यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

IPL Auction 2021 live streaming क्रिकेटप्रेमी भारत देशामध्ये या खेळाप्रती असणारं वेड काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अशा या देशात आयपीएल स्पर्धेला असणारी लोकप्रियता हीसुद्धा तितकीच कमाल. यंदाच्या वर्षी आगामी क्रिकेट सामन्यांपवर क्रिकेट विश्वाचं लक्ष असतानाच आयपीएलच्या लिलावाकडेही सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
आयपीलएच्या आगामी मोसमाआधी देशविदेशातल्या तब्बल 292 खेळाडूंवर उद्या बोली लागणार आहे.
आयपीलएच्या आगामी मोसमाआधी देशविदेशातल्या तब्बल 292 खेळाडूंवर उद्या बोली लागणार आहे.
चेन्नईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयपीएलचा लिलाव आज दुपारी तीन वाजता सुरू होईल.
आयपीएलच्या लिलावासाठी 1114 खेळाडूंनी आपल्या नावांची नोंदणी केली होती. त्यापैकी 164 भारतीय आणि 128 परदेशी खेळाडूंच्या नावाची लिलावासाठी छाननी करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

IPL Auction 2021 LIVE Streaming Updates: क्रिकेटप्रेमी भारत देशामध्ये या खेळाप्रती असणारं वेड काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अशा या देशात आयपीएल स्पर्धेला असणारी लोकप्रियता हीसुद्धा तितकीच कमाल. यंदाच्या वर्षी आगामी क्रिकेट सामन्यांपवर क्रिकेट विश्वाचं लक्ष असतानाच आयपीएलच्या लिलावाकडेही सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आयपीएलसाठी खेळाडूंचा चेन्नईमध्ये लिलाव सुरु झाला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.