एक्स्प्लोर

आयपीएल लिलावात दोन भारतीय दिग्गजांवर सेहवागची नजर

27 आणि 28 जानेवारी रोजी होणाऱ्या लिलावात 578 खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने रणनिती बनवणं सुरु केलं आहे. केवळ अक्षर पटेलला रिटेन करत पंजाबने लिलावात मोठा धमाका करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी होणाऱ्या लिलावात 578 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटर आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आयपीएलच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये पंजाबच्या धोरणावर बोलताना सांगितलं की, ''आमची नजर सध्या भारतीय संघातून बाहेर असलेल्या ऑलराऊंडर युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्यावर असेल. हे दोन्ही खेळाडू संघात आल्याने संघाची लोकप्रियता आणखी वाढेल''. पंजाबचे स्टार असलेल्या युवराज आणि हरभजनला संघात पाहणं चाहते पसंत करतील, असं सेहवाग म्हणाला. दरम्यान, आशिष नेहरा वयाच्या 36 व्या वर्षी संघात पुनरागमन करु शकतो, तर युवराज का नाही, असंही सेहवागने युवीच्या पुनरागमनावर बोलताना सांगितलं. तो अजूनही एक अद्भूत खेळाडू असून त्याचं टॅलेंट कायम आहे, असं तो म्हणाला. युवराज आतापर्यंत आयपीएलच्या पाच संघांकडून खेळला आहे. 2014 च्या लिलावात 14 कोटींसह तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. सनरायझर्स हैदराबादने त्याला खरेदी केलं होतं. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 120 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या खात्यात 2587 धावा आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युवराज फॉर्मात नसल्याने तो भारतीय संघाबाहेर आहे. फिटनेससाठीही तो मेहनत घेत आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात युवराजची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तो त्याच्या होम टीममध्ये जातो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे हरभजन सिंह मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पंजाब संघासोबत त्याच्या जुन्या आठवणीही जोडलेल्या आहेत. पहिल्याच मोसमात पंजाबकडून खेळणाऱ्या हरभजनने एस. श्रीशांतच्या श्रीमुखात लगावली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB IPL 2026 Team Playing XI: धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Abrar Ahmed : पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, द हंड्रेड लीगमध्ये खेळणार
पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, नेटकरी संतापले
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Embed widget