IPL 2024 Retention : इंडियन प्रीमियर लीग 2024 ची तयारी सुरू झाली आहे. संघ खेळाडूंना सोडण्याची आणि कायम ठेवण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी आज रविवार (26 नोव्हेंबर) हा शेवटचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जसह सर्व 10 संघ त्यावर काम करत आहेत. हार्दिक पांड्याबाबत महत्त्वाच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पांड्या गुजरात सोडून पुन्हा मुंबईत येऊ शकतो. पंड्यासह अनेक खेळाडूंवर नजर असेल.






पंजाब किंग्ज रिलीज यादी


भानुका राजपक्षे
मोहित राठी
बलतेज धांडा
राज बावा
शाहरुख खान






राजस्थान रॉयल्सने या खेळाडूंना कायम ठेवले


संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, कुणाल सिंग राठोड, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, जोस बटलर, डोनोवन फरेरा, ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, कुलदीप सेन, अॅडम झाम्पा, संदीप शर्मा, अवेश खान (एलएसजीकडून ट्रेड)






राजस्थान रॉयल्स रिलीज यादी 


जो रूट
अब्दुल बाशीथ
आकाश वशिष्ठ
कुलदीप यादव
ओबेद मॅकॉय
मुरुगन अश्विन
केसी करिअप्पा
केएम आसिफ





दिल्ली कॅपिटल्स रिलीझ खेळाडूंची यादी 


रिले रासोऊ 
रोव्हमन पॉवेल
मनीष पांडे
फिलिप मीठ
मुस्तफिजुर रहमान
चेतन साकरीया
सरफराज खान
कमलेश नगरकोटी
रिपल पटेल
अमन खान
प्रियम गर्ग






कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची अधिकृतपणे यादी जाहीर करण्याची वेळ संपली आहे. लवकरच सर्व संघांची यादी जाहीर केली जाईल. असे मानले जाते की 50 हून अधिक खेळाडूंना सोडले जाऊ शकते. आज 50 हून अधिक खेळाडूंना सोडले जाऊ शकते, असा विश्वास माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने व्यक्त केला. तो म्हणतो की सर्व संघांना जास्तीत जास्त पैसे देऊन लिलावात जायला आवडेल. अशा स्थितीत अनेक खेळाडू सोडले जाऊ शकतात.






इतर महत्वाच्या बातम्या