CSK released players : आयपीएल 2024 साठी चेन्नईने जाहीर केलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. संघाच्या कायम ठेवलेली यादी पाहिल्यास चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी महेंद्रसिंग धोनीच्या रूपाने असेल. धोनीला चेन्नईने कायम ठेवले आहे, याचा अर्थ असा आहे की तो स्पर्धेच्या पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये संघाची धुरा सांभाळेल. याशिवाय चेन्नईने काही कठोर निर्णय घेत स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला सोडले आहे.
कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी
महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेकर, मिशेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोळंकी, महिष तेक्षाना, अजिंक्य शेख, एन.एन. सिंधू, अजय मंडल.
सोडलेल्या खेळाडूंची यादी
बेन स्टोक्स ड्वेन प्रिटोरियस, काइल जेमिसन, आकाश सिंग, अंबाती रायडू (निवृत्त), सिसांडा मगला, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती.
कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची अधिकृतपणे यादी जाहीर करण्याची वेळ संपली आहे. लवकरच सर्व संघांची यादी जाहीर केली जाईल. असे मानले जाते की 50 हून अधिक खेळाडूंना सोडले जाऊ शकते.
दिल्ली कॅपिटल्स रिलीझ खेळाडूंची यादी
रिले Rossouwरोव्हमन पॉवेलमनीष पांडेफिलिप मीठमुस्तफिजुर रहमानचेतन साकरीयासरफराज खान-कमलेश नगरकोटीरिपल पटेलअमन खानप्रियम गर्ग
राजस्थान रॉयल्स रिलीज खेळाडू
जो रूटअब्दुल बाशीथआकाश वशिष्ठकुलदीप यादवओबेद मॅकॉयमुरुगन अश्विनकेसी करिअप्पाकेएम आसिफ
इतर महत्वाच्या बातम्या