IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2021 चं 14 वं सत्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे.  आयपीएल 2021 च्या बायो बबलमध्ये कोरोनाने प्रवेश केल्यामुळे आयपीएल मधेच थांबवली गेली होती. पण आता आयपीएल लीग पुन्हा एकदा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्या अगोदर Emirates Cricket Board के महासचिव मुबशीर उस्मानी यांनी एक चांगली बातमी दिली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे.


महासचिव मुबशीर उस्मानी म्हणाले, आयपीएलमध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी या संदर्भात आम्ही बीसीसीआय आणि आयसीसी यांच्याशी चर्चा करणार आहे. परवानगी मिळाली तर किती प्रेक्षकांना परवानगी द्यावी तसेच प्रेक्षकांसाठी काय नियम असतील या संदर्भात चर्चा करणार आहे. आमची इच्छा आहे की, 'क्रिकेटप्रेमींनी मॅच आनंद स्टँड्समध्ये बसून घ्यावा'. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. 


युएई सरकारने दिली 60 टक्के प्रेक्षकांना  अनुमती


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युएई सरकारने आयपीएलमधील सामने पाहण्याकरता मैदानाच्या क्षमतेनुसार 60 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परंतु बीसीसीआयने अद्याप यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही. 


कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले सामने


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलली होती. यानंतर बीसीसीआयने सांगितले होते की ते आयपीएलचे उर्वरित सामने भारताऐवजी युएईमध्ये आयोजित केले जातील. पुढे ढकलण्यापूर्वी आयपीएलचे एकूण 29 सामने भारतात झाले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल दरम्यान अखेरचा सामना खेळला गेला होता. त्यात दिल्लीने 7 विकेट्सने विजय मिळवला होता.


इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून झाली होती. आयपीएल 14 चा पहिला टप्पा मुंबई आणि चेन्नई येथे झाला होता. दिल्ली-अहमदाबादला स्थानांतरित होईपर्यंत ही स्पर्धा अतिशय यशस्वीरीत्या चालू होती. 1 मे रोजी बायो बबल ब्रेक झाला आणि एकाच वेळी अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. परिणामी बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला.


संबंधित बातम्या :


UAE आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान भिडणार 24 ऑक्टोबरला