नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने आगामी टी-20 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामध्ये भारताचा पहिलाच सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप हा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान होणार असून त्याचे आयोजन हे यूएई आणि ओमानमध्ये केलं जाणार आहे. 


भारताचा समावेश ग्रुप 2 मध्ये असून यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझिलंड हे संघही आहेत. भारत- पाकिस्तानचा सामना हा 24 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझिलंडमध्ये 31 ऑक्टोबरला सामना होणार आहे. भारताचा त्या पुढचा सामना हा  3 नोब्हेंबरला अफगाणिस्तानशी होणार आहे. 


 




या टी-20 वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना हा 10 नोव्हेंबरला खेळवला जाणार असून दुसरा उपांत्य सामना हा 11 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा 14 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. 


आयसीसीच्या 12 संघामध्ये रंगणाऱ्या या  विश्वचषकाच्या थरारात आठ संघ पहिल्या राऊंडमध्ये खेळताना दिसतील. या आठ संघांना ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये विभाजन करण्यात आलं आहे. आयसीसीच्या या स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयकडे राहणार असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. दुबईचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबु धाबीचे शेख जायेद स्टेडियम आणि ओमन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. 


भारताच्या सामन्याचे वेळापत्रक 



  • 24 ऑक्टोबर- भारत वि.पाकिस्तान

  • 31 ऑक्टोबर- भारत वि. न्यूझिलंड

  • 3 नोव्हेंबर- भारत वि. अफगाणिस्तान

  • 5 नोव्हेंबर- भारत वि. क्वॉलिफायर ग्रुप बी विजेता टीम

  • 8 नोव्हेंबर- भारत वि. क्वालिफायर ग्रुप ए रनर अप टीम


महत्वाच्या बातम्या :