IPL 2020 RR vs SRH: आज आयपीएलच्या मैदानात राजस्थान विरूद्ध हैदराबाद भिडणार, कोण बाजी मारणार?
आज आयपीएलच्या मैदानात राजस्थान विरूद्ध हैदराबादचा सामना रंगणार आहे. संघातील स्टार फलंदाज केन विल्यमसन राजस्थान रॉयल्सच्या विरोधातील सामना खेळणार नाही
RR vs SRH: आयपीएलचा 40 वा सामना गुरुवारी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात संध्याकाळी रंगणार आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक आहे.
हैदराबाद आतापर्यंत नऊ सामने खेळला आहे. पॉईंट टेबलमध्ये सामन्यांत सहा गुण मिळवून सातव्या स्थानावर आहे. तर राजस्थान 1o सामन्यांत आठ गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे. पाच सामने बाकी असलेल्या हैदराबादला आणखी एकसुद्धा पराभव परवडणारा नाही. राजस्थानची स्थिती त्या तुलनेत बरी आहे.
राजस्थान रॉयल्स संघात जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरसारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघात डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, जेसन होल्डर आणि राशिद खान सारखे खेळाडू आहेत.
आधीपासूनच संकटांचा सामना करत असलेल्या हैदराबादच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार फलंदाज केन विल्यमसन राजस्थान रॉयल्सच्या विरोधातील सामना खेळणार नाही.
संभाव्य टीम :
राजस्थान रॉयल्स - रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रियन पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, अंकित राजपूत आणि कार्तिक त्यागी.
सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, जेसन होल्डर, प्रियांम गर्ग, विजय शंकर, अब्दुल समद, रशीद खान, संदीप शर्मा, टी नटराजन आणि बासिल थंपी.