एक्स्प्लोर

IPL 2020, MIvsRCB: मुंबईचा बंगलोरवर 5 विकेट्सनी विजय, मुंबईची प्ले-ऑफमध्ये धडक

बंगलोरने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य मुंबईने 19.1 षटकात पूर्ण करत विजय नोंदवला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 79 धावांनी नाबाद निर्णायक खेळी केली.

IPL 2020, MIvsRCB: मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 5 विकेटने पराभव केला आहे. मुंबई आजच्या विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. बंगलोरने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य मुंबईने 19.1 षटकात पूर्ण करत विजय नोंदवला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 79 धावांनी नाबाद निर्णायक खेळी केली.

बंगलोरने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक 18 धावांवर बाद झाला. ईशान किशनला डावाची सुरुवात चांगली केली पण मोठा फटका खेळताना तो 25 धावांवर बाद झाला. सौरभ तिवारी आणि कृणाला पांड्याही स्वस्तात माघारी गेले. सौरव तिवारीने 5 तर कृणाल पांड्याने 10 धावा केल्या. एकीकडे एक एक फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत अर्धशतक ठोकले. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांवर 79 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 17 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. बंगलोरकडून मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहलने प्रत्येक दोन तर ख्रिस मॉरिसने एक विकेट घेतली.

त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात दमदार झाली. जोश फिलिप आणि देवदत्त पड्डिकल यांनी पहिल्या विकेटसाठी 7.5 षटकांत 71 धावांची भागीदारी केली. फिलिप 24 चेंडूत 33 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 14 चेंडूत केवळ 9 धावा करून बाद झाला. बुमराहने त्याला माघारी धाडलं. कोहलीनंतर एबी डिव्हिलियर्ससुद्धा 15 धावांवर बाद झाला.

डिव्हिलियर्सनंतर देवदत्त पड्डिकलही 74 धावांवर बाद झाला. पड्डिकलने यंदाच्या सीजनमधलं चौथं अर्धशतक झळवावलं. पड्डिकलनंतर शिवम दुबे आणि ख्रिस मॉरिसही स्वस्तात माघारी परतलं. डावाच्या शेवटी वॉशिंग्टन सुंदरने 6 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या आणि गुरकीरतसिंग मानने 11 चेंडूंत नाबाद 14 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने उत्तम गोलंदाजी करत चार षटकांत 14 धावा देत तीन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget