IPL 2020, DCvsKKR : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत
दिल्लीने दोन सामने जिंकून आयपीएलची सुरुवात चांगली केली आहे. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन यांच्यावर प्रमुख फलंदाजीची धुरा असणार आहे.
IPL 2020, DCvsKKR: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आजचा दुसरा सामना रंगणार आहे. शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात आतापर्यंत मोठी धावसंख्या उभी राहिल्याचं दिसून आलं आलं आहे. दिल्ली आणि कोलकाता दोन्हा संघांकडे मोठी फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या उभी राहण्याची जास्त शक्यता आहे.
कोलकाताच्या आंद्रे रसेल, इऑन मॉर्गन, सुनील नरिन यांच्या सर्वांच्या नजरा असतील. गेल्या लढतीत शुभमन गिल, शिवम मावी, कमलेश नागरकोटी या युवा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर कोलकाताने राजस्थानचा पराभव केला होता. त्यामुळे या युवा खेळाडूंची कामगिरीही निर्णायक ठरु शकते.
दिल्लीने दोन सामने जिंकून आयपीएलची सुरुवात चांगली केली आहे. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन यांच्यावर प्रमुख फलंदाजीची धुरा असणार आहे. अजिंक्य रहाणेला आजच्या सामन्यात संधी मिळू शकते. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्किया हे दोन्ही आफ्रिकन गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अमित मिश्राही प्रभावी कामगिरी करत आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ कोलकाताला नमवून पुन्हा विजयी पथावर परतण्यासाठी उत्सुक आहे.