एक्स्प्लोर
मुंबई इंडियन्स - हैदराबाद सनरायझर्स सामन्यात रोमांच, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा विजय
आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने देखील वीस षटकांत 162 धावांचीच मजल मारली. मनीष पांडेनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकारानं सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना निर्धारित वीस षटकांत टाय करून दिला.

मुंबई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमधील सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. या सामन्यात मुंबईनं हैदराबादला विजयासाठी 162 धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने देखील वीस षटकांत 162 धावांचीच मजल मारली. मनीष पांडेनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकारानं सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना निर्धारित वीस षटकांत टाय करून दिला.
बुमराहने टाकलेल्या सुपरओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर मनीष पांडे धावबाद झाला. यानंतर नबीने एक षटकार लगावला. मात्र चौथ्या चेंडूवर क्लिनबोल्ड झाल्याने मुंबईसमोर 9 धावांचेच लक्ष्य ठेवले. हैदराबादकडून राशिद खानने टाकलेल्या या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. तीन चेंडूत मुंबईने विजय संपादित केला.
या विजयासह मुंबईने गुणतालिकेत दुसरे स्थान प्राप्त करत प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.
या सामन्यात मुंबईनं हैदराबादला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनं 19 षटकं आणि पाच चेंडूंत सहा बाद 156 धावांची मजल मारली होती. हैदराबादला विजयासाठी एका चेंडूंत सात धावांची गरज होती. त्या परिस्थितीत मनीष पांडेनं हार्दिक पंड्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून हैदराबादला सामना टाय करून दिला.
मुंबईने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वृद्धिमान साहाने चांगली सुरुवात केली होती. पण चौकार लगावण्याच्या प्रयत्नात लुईसने त्याचा अप्रतिम झेल टिपला. साहाने 15 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. हैदराबादचे गडी बाद होत असताना मनीष पांडेने एक बाजू लावून धरली आणि दमदार अर्धशतक केले आणि सामना बरोबरीत सोडविला.
त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितने 5 चौकरासह 18 चेंडूत 24 धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवच्या साथीने क्विंटन डी कॉकने मुंबईचा डाव पुढे नेला आणि अर्धशतकी भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने तडाखेबाज खेळी करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार खेचत 23 धावा केल्या. यष्टिरक्षक क्विन्टॉन डी कॉक मुंबईच्या विजयचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं सलामीला 58 चेंडूंत नाबाद ६९ धावांची खेळी उभारून मुंबईच्या डावाला मजबुती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
