एक्स्प्लोर
Advertisement
कृणाल पंड्याची जबरदस्त खेळी, मुंबईचा तिसरा विजय
आता मुंबईला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारायची असेल, तर उर्वरित पाचही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.
इंदूर: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं इंदूरच्या आयपीएल सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबईचा हा नऊ सामन्यांमधला केवळ तिसरा विजय आहे. मोक्याची क्षणी कृणाल पंड्याने झंझावाती खेळी केल्याने मुंबईला विजयापर्यंत पोहोचता आलं.
पंड्याने गरजेच्या वेळी 12 चेंडूत नाबाद 31 धावा ठोकल्या.
त्यामुळे आता मुंबईला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारायची असेल, तर उर्वरित पाचही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलनं अर्धशतक झळकावूनही, पंजाबला 20 षटकांत सहा बाद 174 धावांचीच मजल मारता आली. पंजाबकडून सलामीचे ख्रिस गेल 40 चेंडूत 50 आणि के एल राहुल 20 चेंडूत 24 वगळता, अन्य खेळाडूंना मोठी खेळी साकारता आली नाही.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या स्टोइनिसने हार्दिक पंड्याने टाकलेल्या शेवटच्या म्हणजेच 20 व्या षटकात तब्बल 22 धावा ठोकल्या. त्यामुळे दीडशेपर्यंत कशीबशी पोहोचणारी पंजाबची धावसंख्या पावणे दोनशेपर्यंत पोहोचली.
सोइनिसने 15 चेंडूत 29 धावा केल्या.
मग पंजाबचं 175 धावांचं आव्हान घेऊन मुंबईकडून एविन लुईस आणि सूर्यकुमार यादव मैदानात उतरले.
एविन लुईसचा अपवाद वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांनी उत्तम धावगती राखली. त्यामुळं मुंबईला सहा चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजय साजरा करता आला.
सूर्यकुमार यादवनं सलामीला 57 धावांची खेळी उभारुन, मुंबईच्या या विजयाचा पाया रचला. इशान किशन 19 चेंडूत 25, हार्दिक पंड्या 13 चेंडूत 23 धावा केल्या. तर रोहित शर्मा 15 चेंडूत 24 आणि कृणाल पंड्या 12 चेंडूत 31 धावा करुन नाबाद राहिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement