BWF World Badminton Championship : भारतीय खेळाडू जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये (World Badminton Championship 2022) संमिश्र कामगिरी करताना दिसत आहे. लक्ष्य सेन (Lakshya Sen) प्री क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला असताना किदम्बी श्रीकांत (Kidambi Srikant) मात्र पराभूत झाला आहे. अशामध्ये एचएस प्रणॉय (HS Pranoy) याने मात्र विजयी सुरुवात करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्याने जपानच्या केंटो मोमोटाला (Kento Momota) याला मात दिली आहे. रंगतदार झालेल्या सामन्यात प्रणॉयने 21-17 आणि 21-16 अशा फरकाने सामन्यात विजय मिळवला आहे.   


 


सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. दोघेही तोडीस तोड खेळ करत होते, पण प्रणॉयने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. ज्यामुळे पहिला सेट त्याने 21-17 च्या फरकाने जिंकत सामन्या 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही प्रणॉयने आणखी चांगली कामगिरी करत दुसरा सेट 21-16 अशा फरकाने जिंकत सेट आणि सामना दोन्ही जिंकला.






लक्ष्य सेनचा विजयी तर किदम्बी श्रीकांत स्पर्धेबाहेर 


लक्ष्य सेननं स्पेनच्या लुइस पेनलवार (luis penalvar) याला सरळ सेट्समध्ये मात देत थेट प्री-क्वॉटर्समध्ये अर्थात राऊंड ऑफ 16 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. लक्ष्य सेननं सामना 21-12 आणि 21-10 अशा फरकाने जिंकला.लक्ष्य सेनने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपची विजयी सुरुवात करताना पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या हंस-क्रिस्टियन विटिंगसचा (Hans-Kristian Vittinghus) पराभव केला होता. त्याने सामना 21-12, 21-11 अशा फरकाने जिंकला होता. दुसरीकडे राऊंड 32 ची मॅच खेळणारा किदम्बी श्रीकांत चीनच्या झाओ जुनपेंगला पराभूत करु न शकल्याने स्पर्धेबाहेर गेला आहे. यावेळी पहिल्या सेटमध्येच चीनच्या झावोने अगदी अप्रितम खेळ दाखवत तब्बल 21-9 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये किदम्बीने चांगली झुंज दिली पण फरक जास्त असल्यामुळे अखेर श्रीकांत 17-21 अशा फरकाने पराभूत झाला.


महिला दुहेरीतही पराभव


दुसरीकडे त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीच्या जोडीलाही पराभव पत्करावा लागला. त्यांना मलेशियाच्या पर्ली टॅन (Pearly tan) थिनाह मुरलीधरन (thinaah muralitharan) या जोडीने 8-21 आणि 17-21 च्या फरकाने पराभूत केलं.  


हे देखील वाचा-