India vs West Indies 2nd ODI Live Updates: भारत विरुद्ध वेस्ट इंडीजमधील दुसऱ्या सामन्यात भारत विजयी, 44 धावांनी जिंकला सामना

India vs West Indies 2nd ODI Live Updates: दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

abp majha web team Last Updated: 09 Feb 2022 01:38 PM
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 44 धावांनी विजयी

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 237 धावा केल्यानंतर वेस्ट इंडिजला 193 धावांत सर्वबाद करत सामना जिंकला आहे. शिवाय मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे.

सामना रंगतदार स्थितीत

सामना सध्या रंगतदार स्थितीत असून भारताला विजयासाठी दोन विकेट्सची गरज असून वेस्ट इंडिजला 64 चेंडूत 79 धावांची गरज आहे.

IND vs WI: वेस्ट इंडीजच्या संघाला दुसरा झटका, प्रसीध कृष्णाची उत्कृष्ट गोलंदाजी

 प्रसीध कृष्णानं उत्कृष्ट गोलंदाजी करीत वेस्ट इंडीजच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलंय. वेस्ट इंडीजचा स्कोर 38-2 (9.4)

IND vs WI: भारताचं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 238 धावांचं लक्ष्य

भारतानं 50 षटकात 9 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजच्या संघासमोर 238 धावांचं लक्ष्य ठेवलंय.

IND vs WI LIVE Score: भारताचा अर्धा संघ 177 धावांमध्ये माघारी परतला

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारताचा अर्धा संघ 177 धावांवर माघारी परतला आहे. भारताचा स्कोर- 186/5 (41 ओव्हर)


 

India vs West Indies 2nd ODI Live : केएल राहुल आणि सुर्यकुमार यादवनं संघाचा डाव सावरला

वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ डगमगताना दिसलाय. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. वेस्ट इंडीजची सुरुवात चांगली झाली असून भारतानं 50 धावांच्या आत 3 विकेट्स गमावले आहे. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव मैदानात असून भारताला अवघड परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. 

India vs West Indies 2nd ODI Live :भारताची खराब सुरुवात, रिषभ पंतनंतर विराट कोहलीनंही विकेट्स गमावली 

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवीसीय सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. भारतानं तीन विकेट्स गमावले आहेत. रिषभ पंत आणि विराट कोहली 18-18 धावा करून बाद झाले आहेत. 

India vs West Indies : भारताला पहिला झटका, कर्णधार रोहित शर्मा बाद

रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला झटका बसलाय. कर्णधार रोहित शर्मा 5 धावा करून बाद झालाय. 

Live Cricket Score, IND vs WI 2nd ODI: नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारताला तगडी लढत देऊन वेस्ट इंडिज मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की भारत मालिका जिंकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडीजचा प्लेईंग इलेव्हन संघ

शाई होप (विकेटकिपर), ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, अकेल होसेन, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच


 

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसीध कृष्णा


 

पार्श्वभूमी

India vs West Indies 2nd ODI Live Updates: भारत आणि वेस्ट इंडीज  (IND Vs WI) यांच्यात आज अहमदाबादच्या  (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्डेडिअमवर (Narendra Modi Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, निकोलस पूरन (Nicholas Pooran) वेस्ट इंडीच्या संघाची कमान संभळणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. 


पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव 176 धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या 60 धावांच्या जोरावर भारताने सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. 


संघ- 


भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसीध कृष्णा


वेस्ट इंडीजचा संघ:
शाई होप (विकेटकिपर), ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, अकेल होसेन, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.