Ravindra Jadeja Retirement : एकीकडे टी-20 विश्वचषकाच्या विजयामुळे भारतीय आनंदात न्हाऊन निघाले आहेत. पण या स्पर्धेच्या विजयानंतर टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या शिलेदारांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताने तब्बल 17 वर्षानंतर जेतेपद पटकावल्यामुळे एकीकडे क्रिकेटप्रेमी आनंद व्यक्त करत आहेत. पण विराट, रोहितच्या या निर्णयामुळे तेवढीच नाराजी व्यक्त केली जात आहे. या दोन खेळाडूंच्या निर्णयानंतर आता क्रिकेट जगतातून आणखी एका खेळाडूच्या निवृत्तीचे वृत्त समोर येत आहे. या खेळाडून आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.


रवींद्र जडाने केली निवृत्तीची घोषणा (Ravindra Jadeja Announces Retirement)


हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मैदानात वाघासारखा वावरणारा रवींद्र जडेजा आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट लिहून त्याने आपला हा निर्णय सार्वजनिक केला आहे. रवींद्र जडेजा असा काही निर्णय घेईल, याची कल्पना कोणालाही नव्हती. पण विश्वचषक हाती आल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.






रविंद्र जडेजाने नेमकी काय घोषणा केली? काय म्हणाला? (What is Ravindra Jadeja Announcement)


विराट कोहली, रोहित शर्मानंतर रवींद्र जडेजानं देखील टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुसाट वेगानं अभिमानानं धावणाऱ्या अश्वाप्रमाणं  माझ्या देशासाठी मी माझं सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न केला. इतर फॉरमॅटमध्ये मी माझं सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. टी 20 वर्ल्डकप जिंकण हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझ्या टी 20 कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर आहे. अनेक आठवणी, प्रोत्साहन अन् पाठिंब्यासाठी सर्वांना धन्यवाद, असं रवींद्र जडेजा म्हणाला.


विराट कोहली आणि रोहित शर्माकडून निवृत्तीची घोषणा (Virat Kohli And Rohit Sharma Retirement)


दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. जडेजाच्या अगोदर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. ते दोघेही क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये खेळत राहतील. टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना संपल्यानंतर या दोघांनाही आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती.


हेही वाचा :


सूर्यकुमारने टीपलेला झेल नव्हे तर सिक्सर? डेव्हिड मिलर बाद नव्हता? सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत वेगवेगळे दावे!


'टू ट्रॉफी इन वन फ्रेम', सूर्यादादाच्या पत्नीसोबतच्या खास फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!


Virat Kohli Net Wealth : टीम इंडियाला विजय मिळवून देणारा विराट कोहली किती कोटींचा मालक?