Suryakumar Yadav David Miller Catch : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चारी मुंड्या चित केलं. भारताचा या सामन्यात सात धावांनी विजय झाला. दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीपलेल्या एका झेलमुळे भारताचा विजय सोपा झाला. या अफलातून कामगिरीमुळे त्याची देशभरात वाहवा केली जात आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मात्र त्याने घेतलेल्या याच कॅचवर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्या कॅचचे काही व्हिडीओ शेअर करून सोशल मीडियावर थर्ट अम्पायरने दिलेल्या निर्णयावर शंका व्यक्त केली जात आहे. 


सामन्यात नेमकं काय घडलं? 


दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने टीम इंडियाची चिंता वाढवली होती. अक्षर पटेलच्या पंधराव्या षटकात क्लासेनने चौकार षटकार लगावत सहा चेंडूमध्ये एकूण 24 धावा मिळवल्या. त्यानंतर क्लासेन बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरनेही मोठे फटके मारायला सुरुवात केली होती. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या. पण पहिल्याच चेंडूवर मिलर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने थेट सीमारेषेवर हा झेल टीपून मिलरला तंबूत पाठवलं आणि भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. मिलर बाद झाल्यामुळे भारताचा विजय पक्का झाला. पण सूर्यकुमारच्या या झेलवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 














नेमका काय दावा केला जातोय


सूर्यकुमार यादवच्या या झेलबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. यामध्ये सूर्यकुमारने जेव्हा झेल टीपला तेव्हा त्याचा एक पाय सीमारेषेला लागला होता असं सोशल मीडियावर म्हटलं जातंय. असा दावा करणारे अंतिम सामन्यातील काही फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर करत आहेत. विशेष म्हणजे सूर्यकुमारच्या कॅचबाबतचा पंचांचा निर्णयही चुकला आहे, असं काहीजण म्हणत आहेत. सूर्युकमारच्या हातात जेव्हा चेंडू होता, तेव्हा त्याचा एक पाय सीमारेषेवर लागल्याचे दिसत आहे. थर्ड अम्पायरच्या चुकीमुळे दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला, असा दावा एका नेटकऱ्याने केला आहे.






खरंच डेव्हिड मिलर बाद नव्हता?


दरम्यान, सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओंमध्ये काहीही तथ्य नाही. कारण प्रत्यक्ष मैदानात अनेक कॅमेऱ्यांमध्ये सामना रेकॉर्ड केला जातो. प्रत्येक अँगलने सामन्यातील क्षण टिपून त्याच्याच आधारे थर्ट अम्पायर निर्णय देतो, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 


हेही वाचा :


'टू ट्रॉफी इन वन फ्रेम', सूर्यादादाच्या पत्नीसोबतच्या खास फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!


Virat Kohli Net Wealth : टीम इंडियाला विजय मिळवून देणारा विराट कोहली किती कोटींचा मालक?