Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'टू ट्रॉफी इन वन फ्रेम', सूर्यादादाच्या पत्नीसोबतच्या खास फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!
भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत तब्बल 17 वर्षांनी टी-20 विश्वचषक भारतात आणला. भारताच्या या विजयाचे अनेक शिलेदार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये भारताचा मिस्टर 360 म्हणून ओळख असेलेल्या सूर्यकुमार यादवचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. त्याने सीमारेषेवर घेतलेला अफलातून झेल भारतासाठी टर्निक पॉइंट ठरला.
दरम्यान, भारताने ट्रॉफी जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक फोटो इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये धडाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव आपल्या पत्नीसोबत दिसतोय.
सूर्यकुमार यादवने हे फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून पोस्ट केले आहेत.
तर काही फोटो देविशाने पोस्ट केले असून त्यात सूर्यकुमारला टॅग केलं आहे. या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी हे निवांतपणे झोपले आहेत.
दुसऱ्या एका फोटोमध्ये सूर्यकुमार ट्रॉफीकडे पाहात आहे. तर त्याची पत्नी देविशा सूर्यकुमारकडे पाहताना दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर टीम इंडियाच्या विजयाचा आनंद ओसंडून वाहतोय.
विशेष म्हणजे दोघे पती-पत्नी निद्राधीन असताना त्यांच्या उशाला टी-20 विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी दिसत आहे.
सूर्यकुमारच्या पत्नीने या फोटोसोबत छानसे कॅप्शन दिले आहे. आता आम्हाला शांतपणे झोप लागणार आहे, असं देविशाने म्हटलंय.
सूर्यकुमारने पोस्ट केलेल्या आपल्या स्टोरीमध्ये पत्नीसोबतचा ट्रॉफी हातात असलेला फोटो शेअर केला आहे. दोन्ही ट्रॉफी एकाच फोटोत असं त्याने आपल्या या फोटोमध्ये म्हटलंय.
सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव