India vs South Africa 1st T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या T20 सामन्यात 'पाऊस' बाजी मारणार? ग्राऊंडववर अजूनही कव्हर असल्याने चिंता वाढली
India vs South Africa 1st T20 Weather Updates : भारतीय प्रमाणवेळेनुसार आज (10 डिसेंबर) संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. ग्राउंडवर अजूनही कव्हर असून ते काढण्यात आलेले नाहीत.
India vs South Africa 1st T20 Weather Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्याचा उत्साह पावसामुळे बिघडू शकतो. आज (10 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमधील किंग्समीड स्टेडियमवर हा सामना होणार आहे, त्या वेळेत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय प्रमाणवेळेनुसार आज (10 डिसेंबर) संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. ग्राउंडवर अजूनही कव्हर असून ते काढण्यात आलेले नाहीत.
Kingsmead Stadium currently under cover. pic.twitter.com/zlIRBWi6Fa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 10, 2023
डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल पण दक्षिण आफ्रिकेत तो 4 वाजता असेल. डर्बनमधील हवामान अंदाजानुसार, संध्याकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. रात्रीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ आजच्या सामन्यातील मजा खराब होऊ शकते.
Hello and welcome to our coverage of the three-match T20I series in South Africa. The Kingsmead is currently under covers. ⛈️☔ #TeamIndia #SAvIND pic.twitter.com/5uolod2qYZ
— BCCI (@BCCI) December 10, 2023
सामन्यादरम्यान डर्बनमध्ये तापमान 20 अंशांच्या आसपास असेल. येथे दवबिंदू 17 अंश आहे, म्हणजे या तापमानापेक्षा कमी झाल्यास दवबिंदू कमी होण्याची शक्यता असते. मात्र, आज तापमान इतके कमी राहण्याची शक्यता नाही. हवेत भरपूर आर्द्रता असणार आहे.
टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती
टीम इंडिया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा मालिकेत दिसणार नाही. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे आणि केएल राहुल वनडे मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Hello from the Kingsmead, Durban! 👋
— BCCI (@BCCI) December 10, 2023
We're all set for the #SAvIND T20I series opener 🙌
⏰ 7:30 PM IST
💻 📱 https://t.co/Z3MPyeKtDz#TeamIndia pic.twitter.com/YY6JGHo9jl
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहे. विराट कोहलीही येथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नाही. तो थेट टेस्ट जर्सीमध्येच दिसणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या