India vs New Zealand : टीम इंडियाने 4 बाद 397 धावांचा डोंगर रचल्यानंतर न्यूझीलंडने प्रतिआक्रमण करत सामन्यात रंगत भरली आहे. मोहम्मद शमीने सुरुवातीला दोन धक्के दिल्यानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन आणि डॅरेन मिशेलने नांगर सेमीफायनलच्या लढतीत नांगर टाकला आहे. न्यूझीलंडने 33व्या षटकात 3 बाद 220  अशी मजल मारली आहे. न्यूझीलंडने भारतीय फिरकीचा समर्थपणे सामना केला. केन विल्यमसनला तब्बल तीन जीवदान मिळाल्याने टीम इंडियासमोर आव्हान किंचित वाढले असतानाच पुन्हा एकदा शमी धावून आला. त्याने जीवदान दिलेल्या विल्यमसनला आणि टाॅम लॅथमला बाद केले.   






टीम इंडियाने 400 च्या जवळपास धावा केल्यानंतर न्यूझीलंडकडून सुद्धा काउंटर अटॅक सुरू झाल्याने टीम इंडियासह मैदानातही सन्नाटा पसरला. केन विल्यमसनला सलग तीन जीवदान मिळाल्याने टीम इंडिया बॅकफूटवर दिसत होती. मात्र, शमीचे 33वं षटक निर्णायक ठरले. पहिल्या दहा ओव्हरमध्ये भारताने न्यूझीलंडवरती वर्चस्व गाजवल्यानंतर पुढील 20 षटकांमध्ये भारताला विकेटसाठी घनघोर संघर्ष करावा लागला आहे. मात्र, विकेट हाती लागली नाही.






न्यूझीलंडकडून केन विल्यम्सन आणि मिशेल यांनी घनाघाती फलंदाजी करत भारतीय गोलंदाजीवर नियंत्रण ठेवले. मिशेल सर्वाधिक भारतासाठी डोकेदुखी ठरला असून त्याने शतकी खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या सेमीफायनलमधील अशा अजूनही कायम आहेत. 






इतर महत्वाच्या बातम्या