मुंबई : भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 49 एकदिवसीय शतके झळकावली होती, मात्र आता कोहलीने या दिग्गजाचा विक्रम मोडला आहे. महान तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामने खेळले. किंग कोहली आपला 291 वा वनडे सामना खेळत आहे. याशिवाय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. इथंही कोहलीने सचिन तेंडुलकरचा पराभव केला.






विश्वविक्रम होताच सचिनला मुजरा 


किंग कोहलीनं शतक केल्यानंतर वानखेडे मैदानात उपस्थित असलेल्या सचिन तेंडुलकरला मानाचा मुजरा केला. सचिननं सुद्धा मानाचा मुजरा स्वीकारत अभिवादन केलं.




वानखेडे अनेक रथी महारथी आजचा सामना पाहण्यास उपस्थित आहेत. जो खेळ अपेक्षित होता, तोच खेळ टीम इंडियाकडून झाला. 






दरम्यान, कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकरने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या. पण आता या विक्रमावर कोहलीचेही नाव कोरले आहे. विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात कोहली हा एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.






सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा दुसरा फलंदाज


उल्लेखनीय आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा कोहली हा दुसरा फलंदाज आहे. आपल्या 50 व्या एकदिवसीय शतकाद्वारे, कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 80 वे शतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतकांव्यतिरिक्त कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये २९ शतके आणि आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये १ शतक झळकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 100 शतके झळकावली.