मुंबई : भारतीय संघाने वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 50 षटकांत 4 गडी गमावून 197 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार मारले.






श्रेयस अय्यरने सलग दुसऱ्या सामन्यात शतकाचा टप्पा ओलांडला. मात्र, विश्वचषकात सलग दोन शतके करणारा श्रेयस अय्यर हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम राहुल द्रविडने केला होता. 1999 च्या विश्वचषकात राहुल द्रविडने सलग 2 शतके झळकावली होती.






श्रेयस अय्यरने सलग दुसरे शतक झळकावले


एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रेयस अय्यरने नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले. या सामन्यात श्रेयस अय्यरने 94 चेंडूत 128 धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार मारले. आता श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला आहे. याआधी विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. 113 चेंडूत 117 धावा करून विराट कोहली टीम साऊथीचा बळी ठरला.






विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 50 वे शतक आहे. अशाप्रकारे विराट कोहली वनडे इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.


भारताचे न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य


याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांशिवाय शुभमन गिलच्या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. शुभमन गिल 66 चेंडूत 80 धावा करून नाबाद परतला. याशिवाय केएल राहुलने 20 चेंडूत 39 धावा करत शानदार पूर्ण केले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने 1 बळी घेतला.






इतर महत्वाच्या बातम्या