एक्स्प्लोर

भारत विरुद्ध आयर्लंड आज पहिला टी ट्वेण्टी सामना

भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी ट्वेण्टी सामना आज खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ या दौऱ्यात दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

डब्लिन ( आयर्लंड) : विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्यातला पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज डब्लिनमध्ये खेळवण्यात येईल. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वा सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ या दौऱ्यात दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या दीर्घ इंग्लंड दौऱ्याची रंगीत तालीम म्हणून आयर्लंड दौऱ्यातल्या या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांकडे पाहिलं जात आहे. भारत आणि आयर्लंड संघांत आजवर तीन वन डे आणि एक ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळवण्यात आला आहे. भारतीय संघाच्या 2007 सालच्या आयर्लंड दौऱ्यात उभय संघांत बेलफास्टमध्ये एक वन डे सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर तब्बल अकरा वर्षांनी उभय संघ आयर्लंडच्या भूमीवर ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या निमित्तानं आमने-सामने येतील. Ireland vs India 1st T20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल? Ireland vs India हा सामना 27 जून 2018 रोजी डब्लिन येथे खेळवण्यात येईल. Ireland vs India 1st T20 सामन्याची वेळ काय? हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होईल. Ireland vs India 1st T20 हा सामना कोणत्या चॅनलवर पाहता येईल? Ireland vs India 1st T20  हा सामना सोनी सिक्स या चॅनलवर पाहता येईल.  Ireland vs India 1st T20 हा सामना ऑनलाईन, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? Ireland vs India 1st T20 हा सामना Sony Liv  इथे तुम्ही लाईव्ह पाहू शकाल. आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव भारतीय खेळाडूंसोबत खेळलेला खेळाडू भारताविरुद्ध मैदानात  आयर्लंडच्या संघात असा एक खेळाडू आहे, जो या अगोदर भारतीय खेळाडूंसोबतही खेळला आहे. पंजाबचा सिमी सिंह नावाचा गोलंदाज आयर्लंडचं प्रतिनिधित्व करणार आहे. सिमी सिंहचा जन्म पंजाबमधील मोहालीत झाला. त्याने पंजाबकडून अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19 संघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी न मिळाल्याने तो आयर्लंडला गेला. 2016 साली वयाच्या 31 व्या वर्षी सिमी सिंह आयर्लंडला स्थायिक झाला. भारतीय खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव सिमी सिंह यजुवेंद्र चहल, सिद्धार्थ कौल आणि मनप्रीत गोनी यांसारख्या पंजाबच्या खेळाडूंसोबत खेळला आहे. पंजाबकडून खेळताना तो फलंदाज होता. मात्र आयर्लंडमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीवर भर दिला आणि त्याचा आता संघात ऑलराऊंडर म्हणून समावेश करण्यात आला आहे. सिमी सिंहने सात वन डे आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये त्याने नेदरलँडविरुद्ध पदार्पण केलं होतं. संबंधित बातम्या सिद्धार्थ कौलला संधी, तीन मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर   भारतीय खेळाडूंसोबत खेळलेला खेळाडू भारताविरुद्ध मैदानात    तब्बल 10 वर्षानंतर टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध मालिका खेळणार!   अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या वन डे, टी-20 मालिकेतून वगळलं 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण...
रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावून वृंदावनला पोहोचले, पाहा Video
रविवारी IPL ट्रॉफी जिंकली, सोमवारी डान्स करुन सेलिब्रेशन; आज विराट-अनुष्का चेहऱ्यावर मास्क लावून वृंदावनला पोहोचले, पाहा Video
Team India Schedule : IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड... लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule
IPL संपली, आता टीम इंडिया पुढे सर्वात मोठा चक्रव्यूह; आयर्लंड ते इंग्लंड... लागोपाठ 6 देशांचे दौरे, वाचा संपूर्ण Schedule
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Embed widget