एक्स्प्लोर

चेन्नई कसोटीत टीम इंडिया बॅकफूटवर

चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. शतकवीर मोईन अलीला ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दिलेल्या दमदार साथीनं, इंग्लंडने दिवसअखेर चार बाद 284 धावांची मजल मारली. मोईन अली 120 धावांवर तर बेन स्टोक्स पाच धावांवर खेळत आहे. वास्तविक ईशांत शर्मानं कीटन जेनिंग्सला आणि रवींद्र जाडेजानं अॅलेस्टर कूकला बाद करून इंग्लंडची 2 बाद 21 अशी अवस्था केली होती. पण ज्यो रूट आणि मोईन अलीनं तिसऱ्या विकेटसाठी 146 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला. चेन्नई कसोटीत टीम इंडिया बॅकफूटवर रूट दहा चौकारांसह 88 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर मोईन अलीनं जॉनी बेअरस्टोसह चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली. बेअरस्टोनं तीन षटकारांसह 49 धावांची खेळी उभारली. मोईन अलीनं नाबाद 120 धावांची खेळी बारा चौकारांनी सजवली. दरम्यान, या कसोटीत इंग्लंडनं प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एका ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियानं मुंबईची चौथी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजपासून चेन्नईत पाचवी आणि अखेरची कसोटी खेळविण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम कसोटी जिंकून इंग्लंडवर 4-0 असा विजय साजरा करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. भारत संघ: विराट कोहली (कर्णधार) मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, के नायर, आर. अश्विन, पार्थिव पटेल (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, इशांत शर्मा इंग्लंड संघ: अॅलिस्टर कुक (कर्णधार), केटन जेनिंग्स, जो रूट, मोइन अली, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम डॉसन, आदिल राशिद, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक बॉल 84 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची टीम इंडियाला संधी कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारतानं आजवर इंग्लंडला 4-0 इतक्या मोठ्या फरकानं कधीच हरवलेलं नाही. 1932 सालापासून भारतीय संघ आजवर 151 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. पण त्यात भारताला केवळ एकदाच 4-0 असा विजय साजरा करता आला आहे. 2013 साली भारतानं ऑस्ट्रेलियाला 4-0 असं हरवलं होतं. आता विराटची टीम इंग्लंडला 4-0 अशा फरकानं हरवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सुनील गावसकरांचा विक्रम मोडण्याची विराटला नामी संधी टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला आता सुनील गावसकरांचा विक्रम खुणावतो आहे. कोहलीनं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या चार कसोटी सामन्यांच्या सात डावांत मिळून 128च्या सरासरीनं 640 धावांचा रतीब घातला आहे. एकाच कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक 774 धावांचा विक्रम सुनील गावसकरांच्या नावावर आहे. गावसकरांनी आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत म्हणजे 1971 सालच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर ही कामगिरी केली होती. गावसकरांचा हा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला अजून 135 धावांची गरज आहे. कोहलीनं याआधी 2014-2015 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 692 धावांचा रतीब घातला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Shreyas Iyer IND vs IRE 2nd T20 : नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Hospital : मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
Pune Bangalore Highway : सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
Embed widget