एक्स्प्लोर

IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा दुसरा डाव 81 धावांवर गारद, अक्षर पटेल, अश्विनची भेदक गोलंदाजी

इंग्लंडने दुसर्‍या डावात भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर पूर्ण शरणागती पत्करली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 25 धावा केल्या.

IND vs ENG 3rd Test: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणारी तिसरी कसोटी भारताने आपल्या मुठीत घेतली आहे. पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळवल्यानंतर भारताने इंग्लंडला दुसर्‍या डावात केवळ 81 धावांत गुंडाळले आहे. आता भारताला विजयासाठी अवघे 49 धावांचे लक्ष्य मिळाले. दुसर्‍या डावात इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अक्षर पटेलने पाच विकेट घेतल्या तर अश्विनने चार गडी बाद केले.

इंग्लंडकडून दुसर्‍या डावात बेन स्टोक्सने 34 चेंडूत सर्वाधिक 25 धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन चौकार ठोकले. त्याच्याशिवाय कर्णधार जो रूटने 19 आणि ओली पोपने 12 धावांची खेळी साकारली. या तिघांशिवाय कोणताही फलंदाज दहाच्या आकड्यांना स्पर्श करू शकला नाही.

INDvsENG 3rd Test : अक्षर पटेलने रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा गोलंदाज

भारताकडून दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या अक्षर पटेलने 32 धावांत पाच बळी घेतले तर अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनने 48 धावा देऊन चार बळी घेतले. या दोन भारतीय गोलंदाजांसमोर एकही इंग्लिश फलंदाज टिकला नाही. या दोघांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संपूर्ण संघ पत्त्याचे घर कोसळावे तसे कोसळले.

तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 145 धावा करत 33 धावांची आघाडी घेतली होती. पण गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव लवकरच संपला. अक्षर आणि अश्विन व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरनेही भारताकडून एक विकेट घेतली.

यासह, अश्विन कसोटीत 400 बळी घेणारा भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर आपली दुसरी कसोटी खेळणारा अक्षर पटेल डे-नाईट टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Ind vs Eng 3rd T20I : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल! फुटबॉल इतिहासातील भारी मॅच; मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक
शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल! फुटबॉल इतिहासातील भारी मॅच; मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक
Ind vs Eng 3rd T20I LIVE : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?
इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget