एक्स्प्लोर

IND vs BAN 3rd T20 : दीपक चहरची हॅट्ट्रिक, 30 धावांनी बांगलादेश पराभूत, मालिका भारताच्या खिशात

भारत आणि बांगलादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यांत टीम इंडियाने 30 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.

नागपूर : यजमान भारत आणि बांगलादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यांत टीम इंडियाने 30 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने श्रेयस अय्यर (33 चेंडूत 62) आणि लोकेश राहुल (35 चेंडूत 52) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 174 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव 144 धावांवर आटोपला.

दीपक चहरने आज त्याच्या टी-20 कारकिर्दीतली पहिली हॅट्ट्रिक घेतली. दीपकने 3.2 षटकांत अवघ्या 7 धावा देत बांगलादेशचे 6 गडी बाद केले. तर शिवम दुबेने 4 षटकात 30 धावा देत 3 गडी बाद केले. यजुवेंद्र चहलनेदेखील एक बळी मिळवला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन आज अपयशी ठरले. पंरतु राहुल-अय्यर जोडीने भारताचा डाव सावरला. बांगलादेशकडून शफीउल इस्लाम आणि सौम्य सरकारने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

174 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला चांगलाच समाचार घेतला. नइमने 48 चेंडूत 81 धावा चोपल्या. तर मिथूनने 27 धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला भारताच्या गोलंदाजांनी फारवेळ मैदानात टिकू दिले नाही.

दरम्यान, दीपक चहरला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
Hardik Pandya and Arshdeep Singh Trade: मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
Embed widget